ब्रिटनमध्ये कोणत्याही कारणासाठी जायचे असेल तर तुम्हाला तब्बल तीन हजार पाऊंडचा बाँड लिहून देणे सक्तीचे करण्यात आले होते. हा नियम भारतासह सहा देशांना लागू होता. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांचा ब्रिटनकडचा ओढा कमी झाला होता. ही बाब लक्षात घेऊन ब्रिटनने हा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी जायचे असेल तर बाँड लिहून घेण्याच्या अटीमुळे भारतीयांवर दोन ते अडीच लाखांचा अतिरिक्त बोजा पडत होता. हा नियम जून २०१३ मध्ये लागू केल्यामुळे त्या वेळेस ब्रिटनमध्ये विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना हा अतिरिक्त खर्च सहन करणे शक्य नव्हते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी ब्रिटनऐवजी इतर देशांमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला होता.
यामुळे ब्रिटनमधील प्रवेशांवर दर वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी फरक पडला. हाच परिणाम ब्रिटनशी संबंधित इतर व्यवहारांमध्येही दिसून आला. यामुळे र्सवकष विचार करून ब्रिटनाच्या मंत्रालयाने ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा दिलासा भारतीय विद्यार्थ्यांना मिळाला आहे. याचबरोबर ब्रिटनमध्ये सातत्याने प्रवास करणारे तसेच पर्यटन करणाऱ्या भारतीयांनाही ही अट रद्द झाल्यामुळे फयदा होणार आहे. ब्रिटनमध्ये भारतातून दर वर्षी ३ लाख ३९ हजार पर्यटक जातात. दोन्ही देशांच्या हिताच्या दृष्टीने ब्रिटनने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सीआयआयतर्फे सांगण्यात आले. हा नियम भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नायजेरिया आणि घाना या देशांपुरताच मर्यादित होता.
भारतीय विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळाला आहे. याचबरोबर ब्रिटनमध्ये सातत्याने प्रवास करणारे तसेच पर्यटन करणाऱ्या भारतीयांनाही ही अट रद्द झाल्यामुळे लाभ होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा