अकरावीला विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी दहावीला किमान ४० गुणांची असलेली अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे, सर्व दहावी उत्तीर्णाना अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेता येणार आहे.
विज्ञानाला अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा, यासाठी किमान गुणांची अट काढून टाकण्याचा प्रस्ताव ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. गेल्या वर्षी ही अट धुडकावून काही कनिष्ठ महाविद्यालयांना हजारो विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश दिला होता. त्यामुळे, हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हापासून ही अट शिथील करण्याचा मुद्दा शालेय शिक्षण विभागाच्या विचाराधीन होता. किमान ४० गुणांची अट काढून टाकल्याने पुढील सर्व शैक्षणिक वर्षांबरोबरच २०१३-१४ला बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा