महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा उंचावा यासाठी परदेशी विद्यापीठांप्रमाणे महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.
भारतातही काही संस्थांचे आर्थिक लेखा परीक्षणाबरोबरच शैक्षणिक परिक्षणही केले जाते. त्याप्रमाणे विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांचे परीक्षण केले जाणार आहे. या लेखा परीक्षणामध्ये आवश्यक मानव संसाधन व पायाभूत सोयीसुविधा यांच्या उपलब्धतेविषयी माहिती संकलनाचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठाशी संबंधित असलेल्या २७ तज्ज्ञांची बैठक विद्यापीठात घेण्यात येणार आहे. त्यात माजी कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञांना समावेश आहे.
येत्या दोन महिन्यात विद्यापीठाशी संलग्नित प्रत्येकी किमान तीन महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेचे लेखा परीक्षण या समित्यांमार्फत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० महाविद्यालयांचे लेखा परीक्षण केले जाईल. या भेटीदरम्यान व्यवस्थापन, प्राचार्य, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधतील.
स्वायत्ततेकरिता कार्यशाळा
नॅककडून ‘अ’ दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याकरिता १५ जूनला विद्यापीठातर्फे प्राचार्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाअंतर्गत अ दर्जा मिळालेली ५२ महाविद्यालये आहेत. भारतातील पहिल्या स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रन मार्गदर्शन करतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा