महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च, २०१५मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी, खासगी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व थोडेच विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत.
 १० डिसेंबरपासून या विद्यार्थ्यांना नावनोंदणी करता येईल. ही नावनोंदणी १६ डिसेंबपर्यंत करता येणार आहे. तर विलंब शुल्कासह १७ ते २२ डिसेंबरदरम्यान नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणीकरिता आपल्या कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधायचा आहे. नोंदणीसाठीचे संकेत स्थळ – http://www.mahahsscboard.maharashtra.gov.in

Story img Loader