मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर होताच मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

* ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे – १८ ते २५ जून
* ऑनलाइन सादर केलेले अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तपासून त्रुटी दुरूस्त करून अद्ययावत करणे – २६ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत.
* प्रथम गुणवत्ता यादी – २ जुलै रोजी सायं. ५ वाजता.
*  प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे – ३ ते ५ जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत.
* द्वितीय गुणवत्ता यादी – ९ जुलै रोजी सायं. ५ वाजता.
* द्वितीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे – १० ते ११ जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ३ वाजेपर्यंत.
* तृतीय व अंतिम गुणवत्ता यादी – १५ जुलै रोजी सायं. ५ वा.
* तृतीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे – १६ ते १७ जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ३ वाजेपर्यंत.

मुंबईतील शाखानिहाय प्रवेश क्षमता
१ कला – शाखेसाठी एकूण ३८ हजार ५५९ जागा आहेत. यातील १५ हजार ०८८ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन यासाठी राखीव आहेत. तर उर्वरित २३ हजार ४७१ जागा ऑनलाइन प्रवेशामध्ये असतील.
२ वाणिज्य – शाखेसाठी एकूण ८४ हजार २१६ जागा आहेत. यातील ३६ हजार ४९४ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन यासाठी राखीव आहेत. तर उर्वरित ४७ हजार ७२२ जागा ऑनलाइन प्रवेशामध्ये असतील.
३ विज्ञान – शाखेसाठी एकूण एक लाख ६० हजार ९४७ जागा आहेत. यातील ७२ हजार ०१२ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन यासाठी राखीव आहेत. तर उर्वरित ८८ हजार ९३५ जागा ऑनलाइन प्रवेशामध्ये असतील.

गुणपत्रकांचे वाटप २६ जून, दुपारी ३ वा.
गुणपडताळणीचा अर्ज करण्यासाठी मुदत २६ जून ते ५ जुलै
छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत – ७ जुलै

निकाल वेळेतच : यावर्षी दहावीच्या निकालाला झालेला उशीर राज्यमंडळाला मात्र मान्य नाही. निकाल वेळेतच लागला असल्याचे राज्यमंडळाचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले, ‘‘गेल्या वर्षी ७ जूनला निकाल जाहीर झाल्यामुळे निकालाला उशीर झाला असल्याचे दिसत आहे. मात्र, यावर्षी निकालाला उशीर झाला नाही, तर गेल्यावर्षी निकाल लवकर लागले होते.’’