क्राफ्ट डिझाइन, टेक्सटाइल डिझाइन, फॅशन अॅण्ड अॅपेरल टेक्नोलॉजी, गेम डिझाइन अशा विविध डिझायनिंग अभ्यासक्रमांची ओळख-
*  प्रोग्राम इन क्राफ्ट डिझाइन :
पारंपरिक हस्तकलेला समकालीन तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्याद्वारे व्यवसायनिर्मिती होऊ शकते, हे लक्षात घेत राजस्थान सरकारने इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्राफ्ट अॅण्ड डिझाइन या संस्थेची स्थापना केली.
संस्थेच्या वतीने ‘अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन क्राफ्ट डिझाइन’ हा चार वर्षे कालावधीचा आणि आठ सत्रांमध्ये विभाजित करण्यात आलेला अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
अर्हता : कोणत्याही विद्याशाखेतील बारावी.
या अभ्यासक्रमांतर्गत आॉफ्ट मटेरिअल अॅप्लिकेशन (प्रवेशजागा २०), हार्ड मटेरिअल अॅप्लिकेशन (प्रवेशजागा २०), फायर मटेरिअल अॅप्लिकेशन (प्रवेशजागा २०) अशा तीन विषयांत स्पेशलायझेशन करता येते.
* पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम : संस्थेचा ‘द पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन क्राफ्टआ अॅण्ड डिझाइन’ हा दोन वर्षे कालावधीचा आणि चार सत्रांमध्ये विभाजित केलेला अभ्यासक्रम आहे.
अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर. या अभ्यासक्रमांतर्गत आॉफ्ट मटेरिअल अॅप्लिकेशन (प्रवेशजागा २०), हार्ड मटेरिअल अॅप्लिकेशन (प्रवेशजागा २०), फायर मटेरिअल अॅप्लिकेशन (प्रवेशजागा २०) अशा तीन शाखेत स्पेशलायझेशन करता येते.
* प्रमाणपत्र अभ्यासक्रम :
* फाऊंडेशन कोर्स इन फॅशन अॅण्ड डिझाइन, कालावधी- एक वर्ष, अर्हता- बारावी, प्रवेशजागा : २०
* सर्टिफिकेट कोर्स इन क्राफ्ट डिझाइन टेक्निक, कालावधी-एक वर्ष, अर्हता- बारावी, प्रवेशजागा : १५
* सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन क्राफ्ट मॅनेजमेंट अॅण्ड एंटरप्रिन्युरशिप, कालावधी – सहा महिने, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी एकूण जागा-१०,
प्रवेशप्रक्रिया : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर क्रिएटिव्ह एबिलिटी टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यात जयपूर, दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, कोलकाता आणि लखनौ येथे घेतली जाते.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रकासाठी १५००
रु.चा डीडी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्राफ्ट अॅण्ड डिझाइन या नावे काढून पाठवा. हा अर्ज http://www.iicdi.org या वेबसाइटवरून डाऊन लोड करता येईल.
पत्ता : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्राफ्ट अॅण्ड डिझाइन,
जे – ८, झालना इन्स्टिटय़ुशनल एरिया, जयपूर- ३०२००४, राजस्थान.
दूरध्वनी : ०१४१- २७०१२०३,
वेबसाइट- http://www.iicd.ac.in
मेल- info@iicd.ac.in, admissions@iicd.ac.in
*  काप्रेट अॅण्ड टेक्स्टाइल डिझाइन :
या संस्थेमार्फत बॅचलर अॉफ टेक्नॉलॉजी इन काप्रेट अॅण्ड टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी हा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम चालविण्यात येतो. बारावी विज्ञान शाखेत ६० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. अशा विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्रात सरासरीने
६५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी JEE-MAIN-२०१३ मध्ये प्राप्त झालेले गुण ग्राह्य धरले जातील.
संस्थेमार्फत काप्रेट निर्मिती क्षेत्रातील अॅडव्हान्स्ड अभ्यासक्रम, होम टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी, टेक्साइल डिझायिनग टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.
पत्ता -इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कार्पेट टेक्नॉलॉजी, चौरी रोड,
भदोही- २१ ४०१, उत्तर प्रदेश, दूरध्वनी- ०५४१४- २२५५०४,
२२८४०९ वेबसाइट- http://www.iict.ac.in
ई-मेल- iict@iict.ac.in
*  फॅशन अॅण्ड अॅपेरल डिझाइन टेक्नॉलॉजी :
सस्मिरा (द सिन्थेटिक अॅण्ड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च असोसिएशन) या संस्थेत पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू आहेत-
* डिप्लोमा इन फॅशन अॅण्ड अॅपेरल डिझाइन टेक्नॉलॉजी.
अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
* अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन फॅशन अॅण्ड अॅपेरल डिझाइन टेक्नॉलॉजी.
अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. अर्हता डिप्लोमा इन फॅशन अॅण्ड अॅपेरल डिझाइन टेक्नॉलॉजी.
करिअर संधी : फॅशन र्मकडायजर, फॅशन मार्केटिंग, फॅशन इलुस्ट्रेटर, फॅशन कन्सल्टण्ट, फॅशन जर्नालिस्ट, फॅशन फोटोग्राफर, फॅशन अॅक्सेसरी डिझायनर, फॅशन पब्लिक रिलेशन्स स्पेश्ॉलिस्ट, फॅशन स्टायलिस्ट, कॉस्चुम डिझायनर, पॅटर्न मेकर.
* सर्टिफिकेट कोर्स इन वेट प्रोसेसिंग ऑफ मॅन मेड टेक्स्टाइल, अर्हता- दहावी उत्तीर्ण. कालावधी- सहा महिने.
* सर्टिफिकेट कोर्स इन केमिकल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, अर्हता- दहावी उत्तीर्ण. कालावधी- सहा महिने.
करिअर संधी : ब्लिचिंग सुपरव्हायझर, डायिंग सुपरव्हायझर, प्रिंट्रिंग सुपरव्हायझर, फिनिशिंग सुपरव्हायझर, क्वालिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्ह, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह फॉर केमिकल्स अॅण्ड मेकॅनिक्स .
पत्ता – सस्मिरा मार्ग, वरळी, मुंबई- ४०००२५.
दूरध्वनी- ०२२-२४९३५३५१.
वेबसाइट- http://www.edu.sasmira.org
ई-मेल- sasmira@vsnl.com
*  गेम डिझाइन :
एसके, सुपीनफोकॉम या संयुक्तसंस्थेने गेम डिझाइन या विषयातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘फाऊंडेशन कोर्स इन गेम डिझाइन अॅण्ड मॅनेजमेंट ऑफ प्रॉडक्शन’अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता – बारावी. प्रवेशासाठी लेखी परीक्षा घेतली जाते.
कालावधी- दोन वर्षे.
संपर्क : मेल- info@dsksic.com
वेबसाइट- http://www.dsksic.com
*  बॅचलर ऑफ आर्ट इन गेम डिझाइन :
इमेज कॉलेज ऑफ आर्ट्स, अॅनिमेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने बॅचलर ऑफ आर्ट (ऑनर्स) इन डिजिटल मीडिया, बॅचलर ऑफ आर्ट इन गेम डिझाइन, बॅचलर ऑफ आर्ट इन गेम प्रोग्रॅिमग, बॅचलर ऑफ आर्ट इन थ्री डी अॅनिमेशन, बॅचलर ऑफ आर्ट इन व्हिज्युएल इफेक्ट्स, बॅचलर ऑफ आर्ट इन फॅशन डिझाइन, बॅचलर ऑफ आर्ट इन अॅडव्हर्टायजिंग डिझाइन, बॅचलर ऑफ आर्ट इन ग्राफिक डिझाइन हे पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कालावधी- ३ वर्षे.
अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील बारावी उत्तीर्ण.
एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम-
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन गेम डिझाइन
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅडव्हर्टायजिंग डिझाइन
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंस्ट्रक्शनल डिझाइन
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन गेम प्रोग्रॅमिंग
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन व्हिज्युएल इफेक्ट्स
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मल्टीमीडिया टेक्नॉलॉजी.
अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी.
पत्ता- इमेज कॉलेज ऑफ आर्ट्स, अॅनिमेशन अॅण्ड
टेक्नॉलॉजी, चेन्नई कॅम्पस- १५३, संथोम हाय रोड, मायलापोर,
चेन्नई- ६००००४, दूरध्वनी- ०४४- ४२७३७७५५. बंगळुरू
कॅम्पस- ४२४, हौसर मेन रोड बोम्मनाहल्ली, बंगळुरू५६००६८,
दूरध्वनी- ०८०-४११०७५५.
वेबसाइट- http://www.icat.ac.in

Story img Loader