विषय – इतिहास
प्र. ४१.    महात्मा जोतिराव फुले यांच्या साहित्याच्या संदर्भात कोणते विधान चुकले आहे?
पर्याय-(अ) १८५५ साली ‘‘तृतीय रत्न’’ हे नाटक महात्मा फुले
यांनी दक्षिणा प्राईज कमिटीला अर्पण केले होत़े (ब) दक्षिणा प्राईज कमिटीने हे नाटक नाकारले होत़े (क) ‘‘छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा’’ हे पुस्तक महात्मा फुले यांनी रावबहादूर रामचंद्र बाळकृष्णजी राणे यांना अर्पण केले होत़े (ड) ‘गुलामगिरी’ हे पुस्तक महात्मा फुले यांनी शूद्र शेतकऱ्यांच्या बचावाकरिता लिहिले होत़े
प्र. ४२     योग्य जोडय़ा जुळवा-
    (अ)    गौतम    १    ज्ञाय्य तत्त्वज्ञान
    (ब)    कनाद    २    पूर्व मीमांसा
    (क)    कपिल    ३    वैशेषिक
    (ड)    जैमिनी    ४    सांख्य
पर्याय-        अ    ब    क    ड
    (१)    ४    ३    २    १
    (२)    ३    ४    १    २
    (३)    ४    ३    १    २
    (४)    ३    ४    २    १
प्र. ४३     एलिफंटा येथील गुहा शिल्पे ही कोणत्या राजवटीत आकारात आली?
पर्याय-    (अ) राष्ट्रकूट    (ब)    चालुक्य
    (क) सातवाहन    (ड)    वाकटक
प्र. ४४     चुकीची जोडी ओळखा-
    संस्थापक     राजवट
अ)    हरिहर     विजयनगर
ब)    हसन गंगू बहामनी     बहामनी
क)    जहिरूद्दीन मुहम्मद बाबर    मोगल
ड)    सिकंदर लोदी     लोदी
प्र. ४५    रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा-
    ़ ़ ़ ़ ़ ़ ़ ़ यांचा उल्लेख सयाजीराव गायकवाड यांनी ‘‘एक धडाडीचा व निष्ठावंत सत्यशोधक कार्यकर्ता’’ आणि ‘‘बहुजन समाजाची मुलूख मैदान तोफ ’’ असा केला होता़
पर्याय-    अ) केशवराव जेधे    ब) दिनकरराव जवळकर
    क) कर्मवीर भाऊराव पाटील    ड) प्रबोधनकार ठाकरे
प्र.४६     १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
पर्याय-अ) १९३५च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार संस्थानिकांना संस्थानांचे प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला़
ब)    हा कायदा बदलण्याचा अधिकार हिंदी कायदेमंडळाला देण्यात आला होता़
क)    संस्थानांना संघराज्यात सामील होण्याची सक्ती नव्हती़
ड)    केंद्रामध्ये द्विदल राज्यपद्धती सुरू करण्यात आली़
प्र. ४७. खालील विधान ‘अ’ व कारण ‘र’ वाचा़
विधान ‘अ’- काँग्रेसने क्रिप्स योजना नाकारली़
विधान ‘र’- क्रिप्स योजनेत फोळणीची अप्रत्यक्ष बीजे होती़
पर्याय-    १)    ‘अ’ असत्य असून ‘र’ सत्य आह़े
    २)    ‘अ’ सत्य असून ‘र’ असत्य आह़े
    ३)    ‘अ’ व ‘र’ ही दोन्ही विधाने सत्य असून ‘र’ हे ‘अ’ चे सुयोग्य स्पष्टीकरण देत़े
    ४)    ‘अ’ व ‘र’ ही दोन्ही विधाने सत्य असली तरी ‘र’ हे ‘अ’ सुयोग्य स्पष्टीकरण देत नाही़
प्र. ४८ खालील विधान ‘अ’ व कारण ‘र’ वाचा़
    विधान ‘अ’- १९४२ च्या चलेजाव आंदोलनात भारतातील कम्युनिस्ट पक्षाने अधिकृतरीत्या सहभाग घेतला नव्हता़  कारण ‘र’ दुसऱ्या महायुद्धात रशिया सुरुवातीला सामील झाला नव्हता़़
पर्याय-    १)    ‘अ’ असत्य असून ‘र’ सत्य आह़े
    २)    ‘अ’ सत्य असून ‘र’ असत्य आह़े
    ३)    ‘अ’ व ‘र’ ही दोन्ही विधाने सत्य असून ‘र’ हे ‘अ’ चे सुयोग्य स्पष्टीकरण देत़े
    ४)    ‘अ’ व ‘र’ ही दोन्ही विधाने सत्य असली तरी ‘र’  हे ‘अ’ सुयोग्य स्पष्टीकरण देत नाही़    (क्रमश:)

Story img Loader