भारतीय राज्यपद्धती व राजकीय व्यवस्था
प्र. ४९. भारतीय राज्यघटनेचा सरनाम्यासंदर्भात अयोग्य विधान ओळखा़
पर्याय- (अ) सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आह़े
(ब) सरनाम्यात पाच स्वातंत्र्याचा उल्लेख आह़े
(क) सरनाम्यात तीन प्रकारचे न्याय उल्लेखिलेले आहेत़
(ड) सरनामा भारतीय जनतेला स्वत:प्रत अर्पण केलेला आह़े
प्र.५०. मार्गदर्शक तत्त्वांतील खालीलपकी कोणत्या तत्त्वचा
उल्लेख उदारमतवादी तत्त्व म्हणून करता येणार नाही़
पर्याय- (अ) न्यायसंस्था व कार्यकारी संस्था यांची परस्परांपासून फारकत़
(ब) समान नागरी कायदा़
(क) राष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाच्या स्थळांचे जतन करण़े
(ड) समान कामासाठी समान वेतऩ
प्र.५१. काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्यानंतर पंधराव्या निवडणुकीपर्यंत सर्वाधिक जागा कितव्या लोकसभा निवडणुकीत मिळाल्या होत्या़
पर्याय- (अ) सातव्या (ब) आठव्या
(क) नवव्या (ड) सहाव्या
प्र.५२. महाराष्ट्रात पहिल्यांदा उपमुख्यमंत्री हे पद कोणी
भूषविले होत़े
पर्याय- (अ) नासिकराव तिरपुडे (ब) रामराव आदिक
(क) वसंतराव नाईक (ड) बाबासाहेब भोसले
प्र.५३. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची तुलना ‘शौर्याचा व इच्छांचा जाहीरनामा’ अशा प्रकारे कोणी केली होती़
पर्याय- (अ) टी़ टी़ कृ ष्णम्माचारी (ब) क़े सी व्हीअर
(क) नसीरुद्दीन (ड) क़े. टी. सहा.
प्र.५४. खालील पैकी कोणत्या संस्था या संवैधानिक आहेत़
(अ) योजना आयोग (ब) राष्ट्रीय विकास परिषद
(क) राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (ड) वित्त आयोग
पर्याय- (१) अ, ब, क, ड (२) अ, ड (३) ब, क, ड (४) ड
विषय – भूगोल
प्र.५५. चुकीचे विधान ओळखा-
(अ) लॅटेराईट मृदेत चुनखडी व मॅग्नेशियम या खनिज द्रव्यांचे प्रमाण कमी असत़े
(ब) गाळाच्या मृदेत पोटॅश व चुनखडीचे प्रमाण जास्त असले तरी नायट्रोजन व सेंद्रिय द्रव्ये यांचे प्रमाण कमी असत़े
(क) डोंगराळ प्रदेशातील मृदेचा रंग फिक्कट तांबडा व नायट्रेट आणि फॉस्फरस या घटकद्रव्यांचे प्रमाण अधिक असत़े
(ड) सोडियम सल्फेटचे प्रमाण जास्त असणाऱ्या मृदांना सलाईन मृदा असे म्हटले जात़े
प्र.५६. चुकीचे विधान ओळखा-
(अ) कोकणाची किनारपट्टी रिया प्रकारची आहे.
(ब) कोणातील खार जमिनीपैकी ८० टक्के ठाणे व रायगड जिल्ह्यात आढळते.
(क) कोकणात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या दक्षिणेकडील भागात आम्ल मृदा आढळते.
(ड) कोकणचा सर्वसाधारण उतार पश्चिम पूर्व दिशेने आह़े
प्र.५७. योग्य विधान/विधाने ओळखा-
(अ) महाराष्ट्रात कोळशाचे सर्वाधिक साठे बल्लारपूर तालुक्यात आढळतात.
(ब) उमरेड तालुक्यात आढळणारा दगडी कोळसा उच्च प्रतीचा असतो.
(क) महाराष्ट्रात दगडी कोळशांचे सर्वाधिक साठे वर्धा नदीच्या खोऱ्यात आढळतात.
(ड) भारताचा दगडी कोळशाच्या एकूण साठय़ापैकी ६% कोळसा महाराष्ट्रात आढळतो.
पर्याय- (१) अ, ब, क (२) अ, ब, ड (३) ब, ड (४) अ, ड
(क्रमश:)
– प्रवीण जा़ भोरे
यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न
भारतीय अर्थव्यवस्था
प्र. ८. चुकीचे विधान ओळखा-
(अ) भारतात दारिद्रय़ाचे प्रमाण मोजण्याचे कार्य नियोजन आयोगामार्फत पार पाडले जात़े
(ब) १९९७ पासून मानव विकास अहवाल मानव दारिद्रय़ निर्देशांक (ऌढक)या संकल्पनेवर आधारित होता़
(क) २०१० चा मानव विकास अहवाल बहुपरिमाणात्मक दारिद्रय़ निर्देशांक (MPI) या संकल्पनेवर आधारित होता़
(ड) स्वतंत्र्यानंतर भारतातील निरपेक्ष दारिद्रय़ाचे प्रमाण कमी होत आह़े तर सापेक्ष दारिद्रय़ाचे प्रमाण वाढत आह़े
प्र.९. ‘नवीन राष्ट्रीय कृषी धोरण’ बाबत खालीलपैकी
कोणते विधान चुकीचे आहे?
(अ) जैवतंत्रज्ञान क्षेत्राला उत्तेजन देणे.
(ब) हे धोरण २००० साली संसदेत जाहीर करण्यात आले होते.
(क) या धोरणात ‘अन्न साखळी क्रांती’ (Food Chain Revolution)चा उल्लेख केला होता.
(ड) धोरणात कृषी उत्पन्नावर कर लावण्याची शिफारस केली होती.
प्र.१०. १९७५ साली इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या वीस कलमी कार्यक्रमात खालील कोणत्या कलमाचा समावेश होत नाही?
(अ) दोन अपत्यांचा निकष (ब) पर्यावरण संरक्षण
(क) सर्वासाठी आरोग्य (ड) सर्वासाठी शिक्षण
प्र.११. अचूक विधान/विधाने ओळखा-
(अ) भारतात अन्नधान्याची दर माणशी उपलब्धता कमी होत आह़े
(ब) २००९ साली भारतातील अन्नधान्याची दर माणशी उपलब्धता वाढलेली दिसते.
(क) कडधान्याची दर माणशी उपलब्धता वाढत असल्याचे दिसून येते.
(ड) सुरेश तेंडुलकर समितीच्या नव्या निकषानुसार दर दिवशी जी सक्ती २८ रुपये अपभोग्य खर्च करते, ती दारिद्रय़रेषेवरील गटात मोडते.
पर्याय- (१) अ, ब (२) अ, ड (३) अ, क (४) अ, ब, क, ड
प्र.१२. ‘आशियाई विकास बँके’ संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आह़े
(अ) या आयोगाच्या शिफारसीनुसार १९६६ साली आशियाई विकास बँकेची स्थापना झाली.
(ब) ADBचा उद्देश आशिया-पॅसिफिक देशातील आर्थिक व सामाजिक विकासाला गती देणे हा होता.
(क) ADBने १९७४साली आशिया विकास निधी (ADF)ची स्थापना केली
(ड) २०११-१३ या वर्षांसाठी ADB भारताने नवीन तीन वर्षीय व्यापार योजना (COBP) जाहीर केली़ त्यानुसार भारतातील सर्वसमावेश व पर्यावरणदृष्टय़ा शाश्वत विकास वृद्धीसाठी ADB सहकार्य करणार आहे
पर्याय- (१) अ, ब (२) अ, ब, क (३) ड (४) अ, ब, क, ड
प्र.१३. अचूक विधाने ओळखा-
(अ) २००० सालापासून भारताच्या परकीय व्यापाराच्या दिशेत सातत्याने बदल आहे.
(ब) २००७-०८ सालापर्यंत अमेरिका हा भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रमुख भागीदार होता.
(क) २००८-०९ साली UAE हा भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रमुख भागीदार झाला.
(ड) २००९-१० पासून चीन हा भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रमुख भागीदार आहे.
पर्याय- (१) अ, ब (२) ड (३) अ, क (४) अ, ब, क, ड
प्र.१४. खालीलपैकी कोणते विधान डच डिसीज् (Dutch Disease) बाबत चुकीचे आहे
(अ) ही संकल्पना १९८२ साली अर्थतज्ज्ञ डब्ल्यू़ मॅक्स कॉर्डन व ज़े पीटर नेअरी यांनी सर्वप्रथम मांडली़
(ब) नैसर्गिक संसाधने (विशेषत: खनिज तेल)च्या अतिरिक्त निर्यातीमुळे देशांतर्गत उत्पादक क्षेत्रावर होणरा नकारात्मक परिणाम या संकल्पनेतून स्पष्ट करता येतो़
(क) १९५९ साली नेदरलँडमध्ये नवीन तेल क्षेत्रांचा शोध लावला व त्यावरून देशातील इतर क्षेत्रांवर झालेला परिणाम या संदर्भात ही संकल्पना पहिल्यांदा वापरली गेली
(ड) ‘डच डीसीज’ या संकल्पनेनुसार देशातून होणारी निर्यात स्वस्त होते
पर्याय- (१) अ, ब, क (२) अ, क (३) ड (४) अ, ब, क, ड
प्र.१५. स्त्रियांचे शिक्षण व जननदर यासंबंधात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
(अ) शिक्षण व रोजगारामुळे स्त्रियांचे विवाहाचे वय वाढले आह़े त्यामुळे जननदरात घट होते.
(ब) शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये स्वतंत्र वृत्ती व निर्णयक्षमता प्राप्त होत़े त्याचा जननदरावर सकारात्मक परिणाम होतो.
(क) शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये संततिनियमनाविषयी जागृती निर्माण होते.
(ड) स्त्री शिक्षणामुळे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे.
(क्रमश:)
– शिल्पा अ़ कांबळे