भारतीय राज्यपद्धती व राजकीय व्यवस्था
प्र. ४९. भारतीय राज्यघटनेचा सरनाम्यासंदर्भात अयोग्य विधान ओळखा़
पर्याय- (अ) सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आह़े
(ब) सरनाम्यात पाच स्वातंत्र्याचा उल्लेख आह़े
(क) सरनाम्यात तीन प्रकारचे न्याय उल्लेखिलेले आहेत़
(ड) सरनामा भारतीय जनतेला स्वत:प्रत अर्पण केलेला आह़े
प्र.५०. मार्गदर्शक तत्त्वांतील खालीलपकी कोणत्या तत्त्वचा
उल्लेख उदारमतवादी तत्त्व म्हणून करता येणार नाही़
पर्याय- (अ) न्यायसंस्था व कार्यकारी संस्था यांची परस्परांपासून फारकत़
(ब) समान नागरी कायदा़
(क) राष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाच्या स्थळांचे जतन करण़े
(ड) समान कामासाठी समान वेतऩ
प्र.५१. काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्यानंतर पंधराव्या निवडणुकीपर्यंत सर्वाधिक जागा कितव्या लोकसभा निवडणुकीत मिळाल्या होत्या़
पर्याय- (अ) सातव्या (ब) आठव्या
(क) नवव्या (ड) सहाव्या
प्र.५२. महाराष्ट्रात पहिल्यांदा उपमुख्यमंत्री हे पद कोणी
भूषविले होत़े
पर्याय- (अ) नासिकराव तिरपुडे (ब) रामराव आदिक
(क) वसंतराव नाईक (ड) बाबासाहेब भोसले
प्र.५३. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची तुलना ‘शौर्याचा व इच्छांचा जाहीरनामा’ अशा प्रकारे कोणी केली होती़
पर्याय- (अ) टी़ टी़ कृ ष्णम्माचारी (ब) क़े सी व्हीअर
(क) नसीरुद्दीन (ड) क़े. टी. सहा.
प्र.५४. खालील पैकी कोणत्या संस्था या संवैधानिक आहेत़
(अ) योजना आयोग (ब) राष्ट्रीय विकास परिषद
(क) राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (ड) वित्त आयोग
पर्याय- (१) अ, ब, क, ड (२) अ, ड (३) ब, क, ड (४) ड
विषय – भूगोल
प्र.५५. चुकीचे विधान ओळखा-
(अ) लॅटेराईट मृदेत चुनखडी व मॅग्नेशियम या खनिज द्रव्यांचे प्रमाण कमी असत़े
(ब) गाळाच्या मृदेत पोटॅश व चुनखडीचे प्रमाण जास्त असले तरी नायट्रोजन व सेंद्रिय द्रव्ये यांचे प्रमाण कमी असत़े
(क) डोंगराळ प्रदेशातील मृदेचा रंग फिक्कट तांबडा व नायट्रेट आणि फॉस्फरस या घटकद्रव्यांचे प्रमाण अधिक असत़े
(ड) सोडियम सल्फेटचे प्रमाण जास्त असणाऱ्या मृदांना सलाईन मृदा असे म्हटले जात़े
प्र.५६. चुकीचे विधान ओळखा-
(अ) कोकणाची किनारपट्टी रिया प्रकारची आहे.
(ब) कोणातील खार जमिनीपैकी ८० टक्के ठाणे व रायगड जिल्ह्यात आढळते.
(क) कोकणात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या दक्षिणेकडील भागात आम्ल मृदा आढळते.
(ड) कोकणचा सर्वसाधारण उतार पश्चिम पूर्व दिशेने आह़े
प्र.५७. योग्य विधान/विधाने ओळखा-
(अ) महाराष्ट्रात कोळशाचे सर्वाधिक साठे बल्लारपूर तालुक्यात आढळतात.
(ब) उमरेड तालुक्यात आढळणारा दगडी कोळसा उच्च प्रतीचा असतो.
(क) महाराष्ट्रात दगडी कोळशांचे सर्वाधिक साठे वर्धा नदीच्या खोऱ्यात आढळतात.
(ड) भारताचा दगडी कोळशाच्या एकूण साठय़ापैकी ६% कोळसा महाराष्ट्रात आढळतो.
पर्याय- (१) अ, ब, क (२) अ, ब, ड (३) ब, ड (४) अ, ड
(क्रमश:)
– प्रवीण जा़ भोरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा