पुणे विद्यापीठाचे नगर उपकेंद्र लवकरच प्रत्यक्षात येणार असून या उपकेंद्रासाठी विद्यापीठाला ७७ एकर जागा मंजूर झाली असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शुक्रवारी सांगितले.पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातील शिक्षणसंस्था पुणे विद्यापीठाअंतर्गत कार्यरत आहेत. आतापर्यंत नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातील महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना प्रशासकीय कामकाजासाठी पुण्यात यावे लागत होते. त्यासाठी नाशिक व नगर येथे दोन्ही ठिकाणी महाविद्यालयाचे उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला. नगर येथील उपकेंद्रासाठी विद्यापीठाला ७७ एकर जमीन मिळाली आहे. उपकेंद्राच्या निर्मितीसाठी जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण होत आला असून या व्यवहाराला आता आवश्यक असलेल्या सर्व मान्यताही मिळाल्या आहेत. याबाबत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.

Story img Loader