प्र. 7.    1)    वित्त आयोगाची रचना घटनात्मकरीत्या म्हणजे घटनेतील कलम 280 मधील तरतुदीनुसार केली जाते.
    2)    वित्त आयोगाच्या शिफारशी मान्य केल्याच पाहिजेत, असे शासनावर कायदेशीर बंध नाही.
पर्याय :    अ) फक्त 1 विधान बरोबर आहे.
    ब)    फक्त 2 विधान बरोबर आहे.
    क)    1 व 2 विधान बरोबर आहे.
    ड)    1 व 2 विधान चूक आहे.
प्र. 8.    वित्त आयोगाच्या बाबतीत खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ)    भारतीच्या वित्तीय संघराज्याचे संतुलन करणारे चाक असे या आयोगाचे स्वरूप आहे.
ब)    वित्त आयोगात मध्ये एक अध्यक्ष आणि तीन सदस्य असतात.
क)    वित्त आयोगाच्या सदस्यांची अर्हता राष्ट्रपती निश्चित करतात.
ड)    भारतीय घटनेच्या अनुच्छेद 280 मधील तरतुदीनुसार या आयोगाची रचना केली जाते.
पर्याय :    अ) 2, 3 आणि 4    ब) 2 आणि 3
    क) 1 आणि 4    ड) 1, 2, आणि 3
प्र. 9.    खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1)    उपराष्ट्रपतींच्या गरहजेरीत राज्यसभा उपाध्यक्ष हे राज्यसभेच्या अध्यक्षांचे कामकाज सांभाळतात.
2)    भारतीय घटनेच्या कलम 110 मध्ये अर्थविषयक विधेयकाची व्याख्या दिली आहे .
3)    पंतप्रधान हे केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो.
पर्याय :    अ)    2 व 3 विधान बरोबर आहे.
    ब)    1 व 3 विधान बरोबर आहे.
    क)    1 व 2 विधान बरोबर आहे.
    ड) 1, 2 व 3 विधान बरोबर आहे.
प्र. 10.    खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1)    उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्याने तो उपराष्ट्रपतींकडे सादर करावा लागतो.
2)    घटनेच्या 213 व्या कलमात प्रत्येक घटक राज्यास एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद अशी तरतूद आहे.
पर्याय :    अ)    फक्त 2 विधान बरोबर आहे.
    ब)    फक्त 3 विधान बरोबर आहे.
    क)    फक्त 1 व 2 विधान चूक आहे.
    ड)    1 व 2  विधान बरोबर आहे.
=    उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्याने तो राष्ट्रपतींकडे सादर करावा लागतो.
=    घटनेच्या 214 व्या कलमात प्रत्येक घटक राज्यास एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद अशी तरतूद आहे.
प्र. 11.    खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1)    महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर एकूण 18 सदस्य पाठविले जातात.
2)    महाराष्ट्र राज्यातून लोकसभेवर एकूण 49 सदस्य पाठविले जातात.
3)    राज्यसभा सभापती हे संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बठकीचे अध्यक्षपद भूषवितात.
पर्याय :    अ)    फक्त 2 विधान बरोबर आहे.
    ब)    2 व 3 विधान बरोबर आहे.
    क)    फक्त 1 विधान बरोबर आहे.    
    ड)    1, 2 व 3 विधान चूक आहे.
=    महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर एकूण 19 सदस्य पाठविले जातात.
=    महाराष्ट्र राज्यातून लोकसभेवर एकूण 48 सदस्य पाठविले जातात.
=    लोकसभा सभापती हे संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बठकीचे अध्यक्षपद भूषवितात.
प्र. 12.    राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकारांसदर्भात खालीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?
पर्याय :    अ)     संसंदेचे अधिवेशन चालू नसतानाच फक्त राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात.
    ब)    राष्ट्रपतींनी काढलेल्या वटहुकूमास संसदेने संमत केलेल्या कायद्याचा दर्जा असतो.
    क)    ज्या बाबींवर कायदे करण्याचे संसदेस अधिकार नाहीत अशा बाबींसंदर्भातच फक्त राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात.
    ड)    संबंधित वटहुकूम संसदेच्या नजीकच्या अधिवेशनात संमतीसाठी ठेवावा लागतो.
प्रश्नांची उत्तरे : प्र. ७- क, प्र. ८- क, प्र. ९- ड, प्र. १०- क, प्र. ११- ड, प्र. १२- क.
(क्रमश:)

devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले
indian-constituation
संविधानभान: जातनिहाय जनगणनेची आवश्यकता
The Supreme Court directed the Ajit Pawar group from the clock symbols
‘घड्याळ’ न्यायप्रविष्ट असल्याचे जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला पुन्हा बजावले
independent manifestos due to credulism no coordination between the three parties in the Grand Alliance print politics news
श्रेयवादामुळे स्वतंत्र जाहीरनामे; महायुतीतील तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे उघड
The decision to reject the election candidature application is correct The Commission's claim in the High Court the petition was rejected
निवडणूक उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निर्णय योग्यच; आयोगाचा उच्च न्यायालयात दावा, याचिका फेटाळली