प्र. 7. 1) वित्त आयोगाची रचना घटनात्मकरीत्या म्हणजे घटनेतील कलम 280 मधील तरतुदीनुसार केली जाते.
2) वित्त आयोगाच्या शिफारशी मान्य केल्याच पाहिजेत, असे शासनावर कायदेशीर बंध नाही.
पर्याय : अ) फक्त 1 विधान बरोबर आहे.
ब) फक्त 2 विधान बरोबर आहे.
क) 1 व 2 विधान बरोबर आहे.
ड) 1 व 2 विधान चूक आहे.
प्र. 8. वित्त आयोगाच्या बाबतीत खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) भारतीच्या वित्तीय संघराज्याचे संतुलन करणारे चाक असे या आयोगाचे स्वरूप आहे.
ब) वित्त आयोगात मध्ये एक अध्यक्ष आणि तीन सदस्य असतात.
क) वित्त आयोगाच्या सदस्यांची अर्हता राष्ट्रपती निश्चित करतात.
ड) भारतीय घटनेच्या अनुच्छेद 280 मधील तरतुदीनुसार या आयोगाची रचना केली जाते.
पर्याय : अ) 2, 3 आणि 4 ब) 2 आणि 3
क) 1 आणि 4 ड) 1, 2, आणि 3
प्र. 9. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1) उपराष्ट्रपतींच्या गरहजेरीत राज्यसभा उपाध्यक्ष हे राज्यसभेच्या अध्यक्षांचे कामकाज सांभाळतात.
2) भारतीय घटनेच्या कलम 110 मध्ये अर्थविषयक विधेयकाची व्याख्या दिली आहे .
3) पंतप्रधान हे केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो.
पर्याय : अ) 2 व 3 विधान बरोबर आहे.
ब) 1 व 3 विधान बरोबर आहे.
क) 1 व 2 विधान बरोबर आहे.
ड) 1, 2 व 3 विधान बरोबर आहे.
प्र. 10. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्याने तो उपराष्ट्रपतींकडे सादर करावा लागतो.
2) घटनेच्या 213 व्या कलमात प्रत्येक घटक राज्यास एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद अशी तरतूद आहे.
पर्याय : अ) फक्त 2 विधान बरोबर आहे.
ब) फक्त 3 विधान बरोबर आहे.
क) फक्त 1 व 2 विधान चूक आहे.
ड) 1 व 2 विधान बरोबर आहे.
= उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्याने तो राष्ट्रपतींकडे सादर करावा लागतो.
= घटनेच्या 214 व्या कलमात प्रत्येक घटक राज्यास एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद अशी तरतूद आहे.
प्र. 11. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1) महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर एकूण 18 सदस्य पाठविले जातात.
2) महाराष्ट्र राज्यातून लोकसभेवर एकूण 49 सदस्य पाठविले जातात.
3) राज्यसभा सभापती हे संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बठकीचे अध्यक्षपद भूषवितात.
पर्याय : अ) फक्त 2 विधान बरोबर आहे.
ब) 2 व 3 विधान बरोबर आहे.
क) फक्त 1 विधान बरोबर आहे.
ड) 1, 2 व 3 विधान चूक आहे.
= महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर एकूण 19 सदस्य पाठविले जातात.
= महाराष्ट्र राज्यातून लोकसभेवर एकूण 48 सदस्य पाठविले जातात.
= लोकसभा सभापती हे संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बठकीचे अध्यक्षपद भूषवितात.
प्र. 12. राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकारांसदर्भात खालीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?
पर्याय : अ) संसंदेचे अधिवेशन चालू नसतानाच फक्त राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात.
ब) राष्ट्रपतींनी काढलेल्या वटहुकूमास संसदेने संमत केलेल्या कायद्याचा दर्जा असतो.
क) ज्या बाबींवर कायदे करण्याचे संसदेस अधिकार नाहीत अशा बाबींसंदर्भातच फक्त राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात.
ड) संबंधित वटहुकूम संसदेच्या नजीकच्या अधिवेशनात संमतीसाठी ठेवावा लागतो.
प्रश्नांची उत्तरे : प्र. ७- क, प्र. ८- क, प्र. ९- ड, प्र. १०- क, प्र. ११- ड, प्र. १२- क.
(क्रमश:)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा