राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारकडून ४८० कोटी रुपयांची आíथक मदत मिळणार असून राज्य सरकारला १२० कोटी रुपयांचा वाटा उचलावा लागणार आहे. या चार महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये अद्ययावत वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी हा ६०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असून प्रत्येक महाविद्यालयास सुमारे १५० कोटी रुपये मिळणार आहेत. औरंगाबाद, लातूर, अकोला आणि यवतमाळ येथील चार वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्राच्या निधीचा लाभ मिळणार आहे. या निधीमुळे या महाविद्यालयांना विविध सुविधांचा लाभ मिळणार आहे.

Story img Loader