होळीचा सणामुळे पुढे ढकलण्यात आलेली शिष्यवृत्तीची परीक्षा रविवार, २३ मार्च रोजी होत असून या परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ६८ हजार ७१३ विद्यार्थी बसले आहेत. कोकणात होळी या सणाला विशेष महत्त्व असते. यामुळे ही परीक्षा १६ मार्च ऐवजी २३ मार्च रोजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य परीक्षा मंडळाने ही परीक्षा पुढे ढकलली होती.
रविवारी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे. पूर्व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवेश परीक्षाही होणार आहेत. पूर्व माध्यमिकसाठी आठ लाख ९० हजार ७७५ विद्यार्थी तर माध्यमिकसाठी सहा लाख ७७ हजार ९४१ विद्यार्थी बसले आहेत. सकाळी ११ ते दुपारी  ४ यावेळात पार पडणाऱ्या या परीक्षेत भाषा व इंग्रजी, गणित व समाजशास्त्र आणि बुद्धीमत्ता चाचणी व सामाज्ञ विज्ञान या विषयांची १०० गुणांची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा राज्यातील नऊ हजार ८९ केंद्रांवर पार पडणार आहे. या परीक्षेसाठी मुंबई आणि विभागातून माध्यमिकसाठी ७५ हजार ८४ तर पूर्व प्राथमिकसाठी ९० हजार ८०४ विद्यार्थी बसले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा