अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या ‘सेंटर फॉर एन्व्हायरॉन्मेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या संस्थेच्या अंतर्गत ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग’ (सीईपीटी)ला केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेची मान्यता प्राप्त झाली आहे. या संस्थांमधील अभ्यासक्रमांची ओळख
बॅचलर ऑफ प्लॅनिंग :
या संस्थेने २०११ सालापासून बॅचलर ऑफ प्लॅनिंग हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. आधुनिक नागरिकरणाच्या अनुषंगाशी निगडित विविध समस्या, प्रश्न, नियोजनातील प्रकिया, पायाभूत सुविधांची निर्मिती आणि पर्यावरणाचे संरक्षण, उपलब्ध भूक्षेत्राच्या उपयोगाचे नियोजन, विकास प्रक्रियेशी निगडित सुशासन आणि राजकारण, नागरी आणि ग्रामीण क्षेत्राशी निगडित अर्थकारण आणि समाजकारण यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना निर्णयक्षमता आणि नियोजनाचे कौशल्य प्राप्त करून दिले जाते. त्याचबरोबर व्यावसायिक नीतिमत्ता, प्रशासन आणि सामाजिक समस्यांची माहिती दिली जाते. पदवी स्तरावरील अभ्यासक्रमात नियोजन, पर्यावरणीय नियोजन, पायाभूत सुविधा नियोजन, गृहनिर्माण, दळणवळण नियोजन या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यापकी एका विषयात पदव्युत्तर पदवी स्तरावर स्पेशलायझेशन करता येते.
अर्हता : या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी विज्ञान परीक्षेत ५० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ४५ टक्के. विद्यार्थ्यांने बारावीमध्ये गणित आणि इंग्रजी या दोन विषयांचा अभ्यास केलेला असावा. प्रवेश प्रक्रिया : या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी प्लॅनिंग अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- ढअळ, संस्थेच्या कॅम्पसमध्ये घेतली जाते. प्लॅनिंग अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टमध्ये चार विषयांवर पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले जातील-
* व्हिज्युअल पस्रेप्शन अ‍ॅण्ड रिप्रेझेन्टेशन- ३० टक्के गुण.
* लॉजिकल रिजिनग अ‍ॅण्ड अ‍ॅनालिटिकल स्किल्स- ३० टक्के गुण
* कम्युनिकेटिव्ह इंग्लिश अ‍ॅण्ड व्हर्बल रिजिनग- २० टक्के गुण
* प्लॅनिंग अवेअरनेस- २० टक्के गुण. या अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टद्वारे ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामध्ये शासनाच्या नियमानुसार विविध संवर्गासाठी राखीव जागा ठेवलेल्या असतात.
अर्ज प्रकिया : या अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ जून २०१३ ही आहे. यासाठी ५०० रुपयांचा डिमांड डठाफ्ट सीईपीटी युनिव्हर्सटिी, स्कूल ऑफ प्लॅनिंग- यूजी, अहमदाबाद या नावे काढून पाठवावा लागेल. अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट २६ जून २०१३ ला घेतली जाईल. १ जुल २०१३ रोजी संध्याकाळी पाच वाजता निकाल घोषित केला जाईल. प्रवेश प्रक्रिया- कौन्सिलिंग ६ जुल २०१३ पासून सुरू होईल. १५ जुल २०१३ पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत : या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या गरजू विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत पुढील प्रकारे साहाय्य केले जाते- आवश्यकतेनुसार शिष्यवृत्ती, गुणवत्ता आणि आवश्यकतेनुसार शिष्यवृत्ती, शिकवणी शुल्क कर्ज शिष्यवृत्ती योजना- या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टय़ा कमकुवत विद्यार्थ्यांना बँकेमार्फत आíथक साहाय्य मिळवून देण्यासाठी ही संस्था सहकार्य करते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कालावधीत त्यांनी शैक्षणिक कर्जावर भरलेल्या व्याजाची ५० टक्के रक्कम परत दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षकि उत्पन्न साडेसात लाख रुपये आहे, अशाच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. स्पेशलायझेशन : हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी स्तरावर पुढील विषयांमध्ये स्पेशलाझेशन करण्याची संधी मिळू शकते- गृहनिर्माण, नगर आणि विभागीय नियोजन, पर्यावरणीय नियोजन, पायाभूत सुविधा नियोजन- इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग, औद्योगिक क्षेत्र नियोजन आणि व्यवस्थापन, नागरी दळणवळण नियोजन आणि व्यवस्थापन, ग्रामीण क्षेत्र नियोजन आणि व्यवस्थापन.
  सिव्हिल कन्स्ट्रक्शन :
याच संस्थेने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (ऑनर्स) सिव्हिल कन्स्ट्रक्शन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला बारावी विज्ञान शाखेत (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी आणि गणितासह) ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाला ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अर्ज व माहितीपत्रकासाठी ५०० रुपयांचा डिमांड डठाफ्ट सेंटर फॉर एन्व्हायरॉन्मेंटल प्लानिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, अहमदाबाद या नावे काढून पाठवा.
  इंटीरिअर डिझाइन :
या संस्थेच्या स्कूल ऑफ इंटीरिअर डिझाइनमार्फत पाच वर्षे कालावधीचा बॅचलर ऑफ इंटीरिअर डिझाइन या विषयातील अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने बारावीला इंग्रजी, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा गणित हे विषय घेतलेले असावेत. संस्थेला अर्ज भेटण्याची शेवटची तारीख १३ जून २००५ ही आहे.
  बॅचलर ऑफ आर्किटेक्चर :
हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम संस्थेच्या फॅकल्टी ऑफ आíकटेक्चरतर्फे चालवला जातो. नॅशनल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट ऑफ आíकटेक्चर या परीक्षेत मिळालेला गुणांचा आधार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतला जातो. पत्ता : सेंटर फॉर एन्व्हायरॉन्मेंटल प्लानिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्‍‌र्हसिटी, स्कूल ऑफ प्लॅनिंग, कस्तुरभाई लालभाई कॅम्पस, युनिव्‍‌र्हसिटी, रोड नवरंगपुरा, अहमदाबाद – ३८०००९. दूरध्वनी : ०७९-२६३०२४७०. वेबसाइट : www.cept.ac.in  ईमेल-  bplan.admission@cept.ac.in
बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रशेन इन रिअल इस्टेट अ‍ॅण्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर :
आरआयसीएस (रॉयल इन्स्टिटय़ूशन ऑफ चार्टर्ड सव्‍‌र्हेअर्स) आणि स्कूल ऑफ बिल्ट एन्व्हायरॉन्मेंट आणि अमिटी युनिव्हर्सटिी या दोन संस्थांनी गृहनिर्माण/ बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी या विषयातील नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. संस्थेने बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन रिअल इस्टेट अ‍ॅण्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही शाखेतील ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड बारावीमध्ये मिळालेले गुण, मुलाखत आणि या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची कारणमीमांसा या तीन बाबींच्या आधारे होईल. या अभ्यासक्रमाची फी दरवर्षांला दीड लाख रुपये आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रशेन इन रिअल इस्टेट अ‍ॅण्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर (इन्व्हेस्टमेन्ट अ‍ॅण्ड फायनान्स या विषयात स्पेशलायझेशन करता येतं.) किंवा मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन कन्स्ट्रक्शन प्रॉजेक्ट मॅनेजमेन्ट या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. पत्ता- आरआयसीएस, स्कूल ऑफ बिल्ट एन्व्हायरॉन्मेंट, अमिटी युनिव्हर्सटिी, अ‍ॅडमिशन ऑफिस, गेट नंबर-३, सेक्टर १२५, नॉयडा- २०१३१३. वेबसाइट- http://www.ricssbe.org http://www.amity.edu, ईमेल- admissions@amity.edu ricssbe@rics.org

Story img Loader