निसर्गातील घडामोडींबद्दल ज्ञान मिळवणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे हे दोन भिन्न घटक आहेत. त्यापैकी पहिल्यास विज्ञान, तर दुसऱ्यास तंत्रज्ञान म्हणतात. मानवाने आपल्या जन्मापासूनच स्वत:च्या गरजा भागवण्यासाठी काही विशेष तंत्रे विकसित केली. या तंत्रांनाच आपण तंत्रज्ञान म्हणत असतो. तंत्रज्ञान म्हणजे निसर्गावर मात करण्याचा व त्यासाठी उपयोगात आणलेल्या तंत्राचा वापर करण्याचा मार्ग होय.
व्याख्या
१) थॉर्न क्राईड- औद्योगिक कलेचे विज्ञान म्हणजे तंत्रज्ञान.
२) एडवर्ड बोनो- ज्ञानाच्या उपयोजनातून काहीतरी उपयुक्त निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे तंत्रज्ञान होय.
शास्त्रज्ञांची ओळख
१) अॅरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४-३२२)
– निगमन तंत्रशास्त्राचे जनक
– जीवशास्त्राचे जनक
– प्राणिशास्त्राचे जनक
– ‘प्राणिसृष्टीचा इतिहास’ या ग्रंथाचे लेखन केले. – ‘उंचावरून पडणाऱ्या वस्तूचा वेग हा त्या वस्तूच्या वजनावर अवलंबून असतो,’ असा सिद्धांत मांडला.
२) युक्लीड (इ.स.पू. ३३०-२७५)
– भूमिती शास्त्रावर ‘एलिमेंट्स ऑफ जिओमेट्री’ हा ग्रंथ लिहून त्यातील मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या.
३) आर्किमिडिज
(इ.स.पू. २८७-२१२)
– सापेक्ष घनतेचा सिद्धांत मांडला. जेव्हा एखादी वस्तू द्रवात पूर्णत: किंवा अंशत: बुडते तेव्हा काही द्रव विस्थापित होतो. त्यामुळे वस्तूच्या वजनात घट होते. वस्तूच्या वजनात झालेली घट विस्थापित द्रवाच्या वजनाइतकी असते. – तरणाचा नियम- तरंगणारी वस्तू तिच्या हवेतील वजनाइतका द्रव विस्थापित करते. – तरतफेचे नियम मांडले.
४) क्लॉडियस
टॉलेमी (इ.स. ९०-१६८)
– अल्माजेस्ट हा ग्रंथ लिहिला.
– भूकेंद्री सिद्धांत मांडला. ग्रह स्वत:च्या परिवलनीय कक्षेत फिरतात.
५) कोपर्निकस
निकोलस (१४७३-१५४३)
– सूर्यकेंद्री सिद्धांत- पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात.
– पृथ्वी स्वत:भोवती फिरते व तिच्या परिवलनाचा कालावधी २४ तास आहे.
– विश्वाचा केंद्रबिंदू पृथ्वी नसून सूर्य आहे.
– खगोलशास्त्राचा जनक
६) गॅलिली गॅलिलिओ
(१५६४-१६४२)
– प्रायोगिक भौतिकशास्त्राचा जनक
– दुर्बिणीचा शोध लावला. – जडत्वाची संकल्पना सर्वप्रथम मांडली. उंचावरून पडणाऱ्या वस्तूचा वेग हा वातावरणातील दाबावर अवलंबून असतो. – शुक्राच्या कला व गुरूच्या उपग्रहाचा शोध लावला.
७) आयझ्ॉक न्यूटन (१६४२-१७२७)
– सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा जनक
– गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला.
– प्रकाशाचा कण सिद्धांत मांडला.
– त्याच्या मते पांढरा प्रकाश हा सात रंगांचे मिश्रण आहे. – प्रकाशाच्या वक्रीभवनाचा सिद्धांत मांडला.
– वस्तूचे गतिविषयक नियम मांडले.
८) चार्ल्स डार्विन (१८०९-१८८२)
– मानवाच्या उत्क्रांतीसंबंधी सिद्धांत मांडला. – डार्विनच्या उत्क्रांतीवादातील तीन महत्त्वाचे टप्पे- जीवनकलह, निसर्गाची निवड, परिवर्तनाचे तत्त्व
९) सिग्मंड फ्रॉईड (१८५६-१९३९)
– मानसशास्त्रातील मनोविश्लेषण शास्त्रांचा जनक. – लैंगिक भावनांचा मानवी वर्तन व विकृतीशी जवळचा संबंध. – सत्यसृष्टीतील अतृप्त आकांक्षा स्वप्नसृष्टीत तृप्त होतात.
१०) अल्बर्ट आईन्स्टाईन
(१८७९-१९५५)
सापेक्षता सिद्धांत मांडला. अंतर, काळ व गती या सापेक्ष संकल्पना आहेत. -वस्तुमान व ऊर्जा यातील संबंध. ए= ेू2
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा