‘व्याख्याता’ पदासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेसाठी (सेट) तब्बल एक वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. ही परीक्षा येत्या १७ फेब्रुवारी रोजी राज्यभरात घेतली जाणार आहे. या वेळी प्रथमच नव्या पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे.
एक वर्षांनंतर सेट परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. याआधी २७ नोव्हेंबर २०११ ला सेट घेण्यात आली होती. त्यानंतर २०१२ मध्ये ही परीक्षा झालीच नाही. मोठय़ा प्रतीक्षेनंतर आता अखेरीस सेटसाठी मुहूर्त मिळाला आहे. याबाबत पुणे विद्यापीठाचे सहकुलसचिव राजेंद्र राहेरकर यांनी सांगितले, ‘‘महाराष्ट्र आणि गोव्याची सेट पुणे विद्यापीठामार्फत घेतली जाते.
दर तीन वर्षांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सेटच्या केंद्रासाठी मान्यता घ्यावी लागते. विद्यापीठ अनुदान आयोगाची समिती सेटच्या केंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी करते.
यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षा, त्याची प्रक्रिया, निकाल या गोष्टींचीही पाहणी या समितीकडून केली जाते. या समितीच्या पाहणीचा अहवाल विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवला जातो. त्यानंतर पुढील परीक्षेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता दिली जाते. सेट परीक्षेच्या मान्यतेसाठी आम्ही फेब्रुवारी २०१२मध्येच विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र, काही कारणास्तव परवानगीची प्रक्रिया लांबल्यामुळे वर्षभरात परीक्षा होऊ शकली नाही.’’
या वेळी प्रथमच नव्या पॅटर्ननुसार सेट होणार आहे. या वेळी नेट प्रमाणेच सेटचा तिसरा पेपर वैकल्पिक असणार आहे. सेटचे ऑनलाईन अर्ज ११ ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये भरायचे आहेत. ८ जानेवारी २०१३ पर्यंत अर्जाची छापील प्रत परीक्षा केंद्रावर जमा करायची आहे. परीक्षेसंबंधी अधिक माहिती आणि अर्ज ११ डिसेंबरनंतर ँ३३स्र्://२ी३ी७ंे.४ल्ल्रस्र्४ल्ली.ूं.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा