डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाच्या विरोधातील आवाज बुलंद करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कंबर कसली असून त्यांनी आता सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू केला अहे. यासाठी त्यांनी फेसबुक पेज तयार केले आहे. तर ट्विटरवरून विविध मंत्री आणि प्रतिष्ठित व्यक्तींना टॅग करून डॉ. हातेकरांवरील कारवाई कशी अन्यायकारक आहे हे दाखवून दिले आहे.
डॉ. हातेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला असून त्यांनी ही मोहीम आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी फेसबुकवर ‘MU student for Dr. Hatekar” नावाचे फेसबुक पेज तयार केले आहे. या पेजवर कारवाईच्या विरोधातील सर्व माहिती तसेच आंदोलनांची छायाचित्रे पोस्ट केली जातात. एका दिवसामध्ये या पेजवर शेकडो लाइक्स आले असून बहुतांश लोकांनी हातेकरांना पाठींबा दर्शविला आहे. ट्विटरवरही याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. डॉ. हातेकर यांच्या विद्यार्थ्यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.
 सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि आंदोलन अधिक तीव्र करणे हा आमचा उद्देश असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा