‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या दहावी-बारावीच्या परीक्षेला थेट अर्ज योजनेअंतर्गत खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अर्ज सादर करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह ३१ जानेवारीपर्यंतच १७ नंबरचे अर्ज सादर करता येतील.
सर्व संपर्क केंद्रे, सर्व मान्यताप्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी व पालक तसेच सर्व संबंधितांनी या मुदतवाढीच्या दिनांकाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader