‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे फेब्रुवारी-मार्च, २०१३मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरित्या बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज विलंब शुल्कासह आता ३१ ऑक्टोबपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. आधी जाहीर केल्याप्रमाणे विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्यासाठी दहावीसाठी ५ ऑगस्ट तर बारावीसाठी २० ऑगस्ट अशी मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, दोन्ही परीक्षांच्या अर्ज नोंदणीच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत १७ क्रमांकाचा अर्ज अतिविलंब शुल्कासह ३१ सप्टेंबपर्यंत स्वीकारला जाईल.

Story img Loader