डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाविरोधात येत्या रविवारी होणाऱ्या दीक्षान्त समारंभावर टाकण्यात आलेला बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय अखेर शुक्रवारी विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दीक्षान्त समारंभाचे महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून या समारंभात विद्यार्थी तोंडावर काळ्या फिती लावून सहभागी होतील, असे जाहीर करण्यात आले आहे.
अनेक विद्यार्थी आणि संस्थांनी बहिष्कार न घालण्याची मागणी केल्यानंतर आम्ही हा बहिष्कार मागे घेण्याचे ठरविल्याचे शुक्रवारी या विद्यार्थ्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. तर बहिष्कार जरी मागे घेतला असला तरी आपण त्या दिवशी तोंडावर काळ्या फिती बांधून मूक निदर्शने करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, डॉ. हातेकर यांना मिळणारा पठिंबा अधिकाधिक वाढत आहे. भारतीय जनता पक्षाने एक प्रसिद्धीपत्रक काढून डॉ. हातेकर यांना पाठिंबा दर्शविला आहे.

Story img Loader