तिसरे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन शनिवारी, १९ जानेवारीला ठाण्यात होणार आहे. गडकरी रंगायतन नाटय़गृहात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात नाटककार शफाअत खान असतील. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. तर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांच्या भाषणाने संमेलनाचा समारोप होईल.
दुपारी १.३० वाजता विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडविण्यामागे शिक्षकांची भूमिका यावर चर्चा होईल. त्यात अच्युत गोडबोले, सुबोध जावडेकर, दा. कृ. सोमण यांना युवराज मोहिते बोलते करतील. दुपारी २.३० वाजता प्रा. प्रज्ञा दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल, अशी माहिती संमेलन संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी दिली. संपर्क – ९८६९००७३६१.
उद्या ठाण्यात शिक्षक साहित्य संमेलन
तिसरे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन शनिवारी, १९ जानेवारीला ठाण्यात होणार आहे. गडकरी रंगायतन नाटय़गृहात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात नाटककार शफाअत खान असतील.
First published on: 18-01-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher cultural conference tomorrow