आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही तज्ज्ञांच्या व्याख्यांनांची रेलचेल असणार आहे. यामध्ये भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव, सॅमसंगचे संशोधन प्रमुख आणि सिक्थ सेन्सचा शोध लावणारे प्रणव मेस्त्री यांचा समावेश आहे.  आयआयटी मुंबईत होणाऱ्या टेकफेस्टची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. यंदा टेकफेस्टमध्ये व्याख्यानासाठी येणाऱ्यांमध्ये किरण बेदी, ट्विटरचे शैलेश राव, अर्थतज्ज्ञ राजेंद्र पचौरी, गणितज्ज्ञ स्टीफन वॉलफर्म, कंवल रेखी, जॉर्डन डे, अडोबेचे सीताराम नारायण या तज्ज्ञांचा समावेश आहे. ही सर्व व्याख्याने ३ ते ५ जानेवारी रोजी आयआयटी मुंबईच्या पवई संकुलात  होणाऱ्या टेकफेस्टमध्ये सर्वासाठी खुली असतील.  http://www.techfest.org/home/event/lectures या संकेत स्थळावर या संदर्भात अधिक माहिती मिळेल.

Story img Loader