१) द.सा.द.शे. १० दराने १०,००० रु.चे तीन वर्षांचे सरळव्याज हे कोणत्या रकमेचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षांच्या सरळ व्याजाएवढे आहे?
ए) २५,००० रु. बी) १५,००० रु. सी) २०,००० रु. डी) १०,००० रु.
२) वडिलांचे आजचे वय मुलाच्या सध्याच्या वयाच्या तिप्पट आहे. पाच वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते; तर वडिलांचे व मुलाचे आजचे वय किती?kg01
ए) ४८ वर्षे, १२ वर्षे बी) ४० वर्षे, १० वर्षे सी) ४५ वर्षे, १५ वर्षे डी) ३० वर्षे, १० वर्षे
३) एका घनाच्या पृष्ठभागाचे एकूण पृष्ठफळ ५४ सें.मी. २ आहे; तर त्या घनाचे घनफळ किती?
ए) ३२ सें.मी. ३  बी) ६४ सें.मी. ३  सी) १६ सें.मी. ३  डी) २७ सें.मी. ३
४) जर ७ व ८ या घनपूर्णाक संख्या असून ७८ = २१६, तर ८७ किती?
ए) ७.२ से.मी बी) ६४ सें.मी. ३ सी) १६ सें.मी. ३ डी) २७ सें.मी.  
५) दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर ३:४ आहे; तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती?
ए) ६:८ बी) ९:१६ सी) १६:९ डी) ३:४
६) समांतरभुज … ढदफर मध्ये ….. तर टछढ = किती?
ए) ८०.. बी) १८०.. सी) ५०.. डी) १३०..
७) सचिनने  स्र् रु  किमतीची फळे विकली असता त्याला १२ टक्के दराने एकूण ५,१०० रुपये कमिशन मिळाले; तर स्र् ची किंमत किती?
ए) ४०,००० रु. बी) ४२,५०० रु. सी) ३२,००० रु. डी) ३०,००० रु.
८) १७, २१, १५, ७, ३०, २०, ३५, २९, ३३ या प्राप्तांकांचे मध्यमान २५ आहे; तर ७ ची किंमत किती?
ए) ४५ बी) ४० सी) ३५ डी) २५
९) एका गोलाची त्रिज्या दुसऱ्या गोलाच्या त्रिजेच्या दुप्पट आहे, जर त्यांच्या घनफळामध्ये २५२७ एवढा असेल, तर मोठय़ा गोलाची त्रिज्या किती?
ए) ६ सें.मी. बी) १० सें.मी. सी) ४.५ सें.मी. डी) ३.५ सें.मी.
१०) २४ सें.मी. बाजू असलेल्या समभूज त्रिकोणाचे क्षेत्रफळ १२ सें.मी. बाजू असलेल्या समभूज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या.. असेल.
ए) सहापट बी) चौपट सी) तिप्पट डी) दुप्पट
११) रोज ७ तास काम करून ‘बी’ एक काम ६ दिवसांत पूर्ण करतो; आणि ‘क्यू’ ८ दिवसांत पूर्ण करतो; तर दोघांनी मिळून तेच काम रोज पूर्ण करण्यास ८ तासांप्रमाणे किती दिवस लागतील?
ए) ३.६ बी) ३.६ सी) ४ डी) ३
१२) दोन संख्यांच्या बेरजेला १२ने भागले तर भागाकार ४ येतो आणि त्याच संख्यांच्या वजाबाकीला ३ने भागले तर भागाकार ८ येतो. दोन्ही बाबतीत जर बाकी असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती असेल?
ए) १३ बी) १२ सी) ३७ डी) ३८
१३) ५ने भागले असता बाकी ३ येणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज..
ए) १५५० बी) ६९९५ सी) ९९०९० डी) ६६६६६६
१४) ६, १३, २०, २७ .. या अंकगणिती श्रेणीचे कितवे पद तिच्या २४ व्या पदापेक्षा ९८ ने जास्त आहे?
ए) ४८ बी) ५८ सी) ६८ डी) ३८
१५) ०, २, ४, ६, ७ या अंकांपासून दोन अंकी संख्या अशा केल्या की, कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती होत नाही, तर यापैकी विषम संख्यांची संभाव्यता किती असेल?
ए) ३ / १५, बी) १ / ४, सी) ५ / १६, डी) १ / ५
१६) सचिनकुमार यांनी ३०,००० रुपयास खरेदी केलेला गहू ३६००० रुपयास विकला व २०,००० रुपयास खरेदी केलेली ज्वारी २४,००० रुपयास विकली तर त्याला कोणते धान्य विकून शेकडा नफा जास्त मिळाला?
ए) गहू, बी) सांगता येत नाही, सी) ज्वारी, डी) दोन्हीत समान
१७) एका कारखान्यात ५००० कामगार काम करतात. दरवर्षी ३० टक्के कामगार कमी केले; तर तीन वर्षांनी किती कामगार उरतील?
ए) १७५१ बी) १७०० सी) १७१५ डी) १७५०
१८) पी, १४, २७, १८ या संख्या प्रमाणात आहेत; तर पी = …
ए) १८ बी) २१ सी) २५ डी) १५
१९) एका विद्यार्थ्यांने एका चाचणीमध्ये ६ विषयांत मिळविलेल्या गुणांची सरासरी १८ आहे; जर त्याने दोन विषयात १५ व १७ ऐवजी १८ व २० गुण मिळवले असते; तर त्यांच्या गुणांची सरासरी किती?
ए) १८.४ बी) १८.१८ सी) १९ डी) १७.८
२०) ५, ७, ८, ७, ८, ६, ५, ८, ७, ५, ७, ८, ५, ६, ८, ७, ५, ७, ७, ६ या सामग्रीत ७ या प्राप्तांकाची वारंवारता…. आहे
ए) ८ बी) ६ सी) ५ डी) ७
२१) दोन भावांच्या आजच्या वयातील अंतर ४ वर्षे आहे. ५ वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर ५:७ होते; तर लहान भावाचे आजचे वय किती?
ए) १८ वर्षे बी) २० वर्षे) सी) १५ वर्षे डी) १२ वर्षे
२२) ५२ पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता    इच्छिक पद्धतीने उचलला तर तो पत्ता राजा किंवा राणी असण्याची संभाव्यता काढा.
ए) ४/१३, बी) २/१३, सी) ८/१३, डी) २/३
२३) शाळेतील विद्यार्थ्यांना कवायतीसाठी रांगेत उभे केले; जर प्रत्येक रांगेत ५ विद्यार्थी कमी असते, तर १० रांगा जास्त झाल्या असत्या. जर प्रत्येक रांगेत ५ विद्यार्थी जास्त असते तर ६ रांगा कमी झाल्या असत्या. तर कवायतीत भाग घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
ए) ७२० बी) ६८० सी) ६०० डी) ५३०
२४) २० लिटर दुधापैकी काही दूध १५ रु. प्रतिलिटर व उरलेले दूध २० रु. प्रतिलिटर याप्रमाणे विकले. विक्रीतून एकूण रु. ३४० मिळाले तर १५ रु. लिटरप्रमाणे किती लिटर दूध विकले?
ए) ५ लिटर बी) १५ लिटर सी) ८ लिटर डी) १२ लिटर
उत्तरे :  १) बी, २) सी, ३) डी, ४) ए, ५) बी, ६) सी, ७) बी, ८) डी, ९) ए, १०) बी, ११) डी,  १२) बी, १३) सी, १४) डी, १५) ए, १६) बी, १७) सी, १८) डी, १९) ए, २०) बी, २१) ए, २२) बी, २३) सी, २४) डी
– प्रा. सचिन परशुराम आहेर
सेवासदन अध्यापिका
विद्यालय, पुणे ३०

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
Story img Loader