राज्यात प्रथमच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जात आहे. या परीक्षेची तयारी कशी करायची, प्रत्येक विषयाचा नेमका अभ्यास कसा करायचा याचा आढावा आतापर्यंत घेतला आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक विषयाची उजळणी व्हावी यासाठी प्रत्येक विषयातील काही सराव प्रश्न..
* नेतृत्त्व म्हणजे व्यक्तीची दृष्टी आणि अभिव्यक्ती उंचाविण्याची आणि व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची प्रक्रिया होय! नेतृत्वाची ही व्याख्या .. या तत्त्ववेत्त्याने केली आहे.
१) मॅकायव्हर, २) पीटर ड्रकर, ३) अरविंद  घोष, ४) डॉ. झाकिर हुसेन
* शिक्षकाने अध्यापन करतेवेळी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावेत, कारण त्यामुळे..
१) विद्यार्थ्यांचा अध्ययन- अध्यापन प्रक्रियेतील सहभाग वाढविता येतो, २) व्याख्यानामुळे येणारा एकसुरीपणा टाळला जातो, ३) विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करता येते, ४) विद्यार्थ्यांना अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, याची जाणिव करून देता येते
* ज्ञानप्रक्रिया सुलभ करणारा ही शिक्षकाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपमा योग्य आहे?
१) तुरुंगाधिकारी, २) कुंभार, २) शिल्पकार, ३) सुईण
* माध्यमिक शिक्षण व्यवस्थेत एकसूत्रीपणा आणण्यासाठी.. या वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली.
१) १९६२, २) १९६५, ३) १९६८, ४) १९७२
* शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षा न केल्यास..
१) इतर विद्यार्थ्यांना शिस्तभंग करण्याचा  मोह होईल, २) त्याच्यामध्ये स्वयंशिस्तीची भावना रुजेल, ३) विद्यार्थी पुन्हा शिस्तभंग करेल, ४) विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी आपुलकी वाटेल
* शिक्षक व पालक यांचे संबंध उत्तम असतील तर..
१) समाजापासून शाळेस भय राहणार नाही, २) शाळेचे समाज संपर्क हे उद्दिष्ट साध्य होईल, ३) शिक्षकांचे अध्यापनाचे ओझे कमी  होईल, ४)  पाल्याच्या विकासाची दिशा योग्य राहील
* ज्ञान ग्रहण करत असताना मानव किंवा विद्यार्थी डोळ्याने ..टक्के ज्ञान ग्रहण करतो
१) ४५, २) ८३, ३) ८०, ४) ७५
* महाराष्ट्र शासनाने वसतिशाळा सुरु करण्याचा निर्णय कोणत्या साली घेतला?
१) २०००, २) १९९९,  ३) २००९, ४) १९८०
* सेवापुस्तिकेच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) शिक्षकाच्या अध्यापनाचे वार्षिक नियोजन व गोपनीय अहवाल इत्यादी नोंद असतात, २) शिक्षक व कर्मचाऱ्याच्या दृष्टीने  महत्त्वाचा दस्तऐवज, ३) यामध्ये वेतनाविषयी कोणत्याही नोंदी नसतात, ४) ते दोन प्रतीत असावे
* पुढीलपैकी कोणते नवोपक्रमाचे उद्दिष्ट नाही?
१) शिक्षकांत असलेल्या सर्जनशीलतेला चालना  देणे, २) अध्ययन- अध्यापनाचे सर्वेक्षण करणे, ३) अध्ययन- अध्यापन अधिक वैविध्यपूर्ण बनविणे, ४) अध्यापनात निर्माण होणाऱ्या समस्या  सोडविण्याचा प्रयत्न करणे
* महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती सभासद आहेत?
१) २५०, २) २३८,  ३) २८८, ४) ५५०
* निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी… वर असते
१ ) सर्वोच्च न्यायालय, २) संसद,  ३) राष्ट्रपती, ४) निवडणूक आयोग
* संविधानाने ज्या स्वातंत्र्याची हमी आपणाला दिली आहे, त्यामध्ये समाविष्ट नसलेली बाब पर्यायांतून निवडा
१) व्यवसाय, २) उच्चशिक्षण,  ३) संघटन, ४) संचार व वास्तव्य
* खालील विषयांपैकी राज्यसूचित समाविष्ट नसलेला विषय कोणता?
१) चलन व्यवस्था, २) कायदा व सुव्यवस्था,  ३) शिक्षण, ४) शेती
* पॅसिफिक महासागरातील उपसागर कोणता?
१) हडसन, २) बंगाल,  ३) बॅफिन, ४) लमॉन
* खालीलपैकी योग्य विधान कोणते?
१) लाटांमुळे सागरी किनाऱ्यांची झीज होत नाही, २) सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात, ३) उष्ण प्रवाहाची निर्मिती ध्रुवीय प्रदेशात होते, ४) लॅब्राडोर प्रवाह हा शीत प्रवाह आहे.
* पंचमहासरोवरांना जोडणारी नदी कोणती?
१) मिसुरी, २) मॅकेन्झी,  ३) टेनिसी, ४) सेंट लॉरेन्स
* खालीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द कोणता?
१) नदी २) गोडी,  ३) गाडी, ४) वाडी
* खालीलपैकी कोणत्या वर्णाला ‘परसवर्ण’ म्हणतात? 
१) द २) ध,  ३) न, ४) प
* खालीलपैकी बरोबर जोडी कोणती?
१) शंकर वसंत कानेटकर – अज्ञातवासी, २) विनायक दामोदर करंदीकर – गिरीश, ३) आत्माराम रावजी देशपांडे – अनिल, ४) दिनकर चिंतामण केळकर – कुसुमाग्रज
* ‘सन्मती’ हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झाला आहे, त्याच नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झाला आहे?
१) मन्वंतर २) वाड.निश्चय,  ३) एकोन, ४) भान्वीश्वर
* ‘हिरण्य’ या अर्थाचा खालीलपैकी समानअर्थी शब्द कोणता?
१) कुरंग २) जंगल,  ३) कनक, ४) राक्षस
* खालील पर्यायातील बरोबर जोडी कोणती?
१) ९ ऑगस्ट – क्रांतिदिन २) ३० एप्रिल – शिवजयंती,  ३)२१ सप्टेंबर – हिंदी दिन, ४) १४ नोव्हेंबर – शास्त्रीजयंती