संख्या :
मूळसंख्या – फक्त त्याच संख्येने किंवा १ ने पूर्णभाग जाणारी संख्या
समसंख्या – २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या, विषमसंख्या – २ ने भाग न जाणारी संख्या
जोडमूळ संख्या – ज्या दोन मूळ संख्यांत केवळ २ चा फरक असतो
संयुक्तसंख्या – मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिक संख्या
– ० ते १०० पर्यंतच्या संख्यांत- ।) २ पासून ९ पर्यंतचे अंक प्रत्येकी २० वेळा येतात. ।।) १ हा अंक २१ वेळा येतो. ।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.
– १ ते १०० पर्यंतच्या संख्यात- ।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी १९ येतात. ।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्या प्रत्येकी १८ संख्या असतात.
– दोन अंकांमधून एकूण २ संख्या, तीन अंकांमधून एकूण ६ संख्या, चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.
लसावि – लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या: दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या
मसावि – महत्तम सामाईक विभाजक संख्या: दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा