इतिहास : वर्तमानकाळ व भूतकाळ यामधील कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास. भूतकाळातील घटना का घडली, तिचे परिणाम यांचा शोध घेऊन तिची नोंद इतिहासात केली जाते. इतिहासातून लोकशाही मूल्यांची जपणूक करता येते, ऐक्याची भावना निर्माण होते, विद्यार्थ्यांना व्यापक दृष्टी मिळते, म्हणून इतिहासाच्या अभ्यासाला महत्त्व आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतिहासातील महत्त्वाचे मुद्दे –
* इ.स. १५९९ मध्ये इंग्लंडमधील व्यापाऱ्यांच्या एका गटाने ‘ईस्ट इंडिया कंपनी’ नावाची एक व्यापारी कंपनी स्थापन केली. या कंपनीस इंग्लंडची तत्कालीन राणी एलिझाबेथ हिने ३१ डिसेंबर १६०० रोजी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली.
* भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज थॉमस स्टीव्हन्स.
* लॉर्ड डलहौसी यांच्या कारकीर्दीत इ.स. १८५३ मध्ये ‘मुंबई ते ठाणे’ हा भारतातील पहिला लोहमार्ग उभारला गेला.
* सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला ‘सत्यार्थप्रकाश’ हा ग्रंथ दयानंद सरस्वती यांनी १८७५ साली लिहिला. मुळात हिंदी भाषेत लिहिलेल्या या ग्रंथाचे २० भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले.
* ‘रास्त गोफ्तार’ म्हणजे ‘खरी बातमी’ या नावाने १८५४ साली दादाभाई नौरोजी यांनी पाक्षिक सुरू केले.
* १८९२ ते १८९५ या कालावधीत दादाभाई नौरोजी हे ब्रिटनच्या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य होते. ब्रिटनच्या सभागृहाचे सदस्यत्व मिळणारे ते आशियातील पहिली व्यक्ती होते.
* वि. दा. सावरकर यांच्या मते १८५७चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होय.
* न. र. फाटक या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून १८५७ चा उठाव म्हणजे ‘शिपाई गर्दी’ होय.
* राजा राममोहन रॉय यांचा ‘भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक’ व ‘आधुनिक भारताचा निर्माता’ म्हणून गौरव केला जातो. ‘ब्राह्मो’ समाजाची स्थापना त्यांनी केली होती.
* स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीचे धडाडीचे पुरस्कर्ते लोकमान्य टिळक होत.
* सरदार पटेलांची तुलना बिस्मार्क (जर्मनी) यांच्याशी केली जाते.
* महाराष्ट्रात सातारा जिल्हा आणि परिसरात ‘प्रतिसरकार’ किंवा ‘पत्री सरकार’ची स्थापना नाना पाटील यांनी केली.
* रासबिहारी बोस यांनी १९४२ साली आझाद हिंद सेनेची स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांनी १९४३ साली आझाद हिंदू सेनेचे प्रमुखपद स्वीकारले.
* ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिला.
* ‘नगण्य संख्येच्या अल्पसंख्याक गटातील उच्चभ्रू वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष,’ या शब्दात इ.स. १८८८ मध्ये लॉर्ड डफरिन या व्हाइसरॉयने काँग्रेसची संभावना केली होती.
* आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवरील खटल्यात जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. हे खटले दिल्लीच्या लाल किल्ल्यात चालविले गेले होते.
नागरिकशास्त्र व प्रशासन
‘नागरिकशास्त्र’ म्हणजे मनुष्याचे भूतकालीन, वर्तमानकालीन, भविष्यकालीन, तसेच स्थानिक, राष्ट्रीय आणि विश्वस्पर्शी जीवन यांचा अभ्यास. सुजाण, कर्तव्यदक्ष आणि राष्ट्राच्या राजकारणात रस घेणारा नागरिक घडवण्यासाठी ‘नागरिकशास्त्र’ या विषयाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे.
महत्त्वाचे मुद्दे
* ‘पंचायतराज’ हे स्वप्न महात्मा गांधी यांनी बाळगले.
* पंचायतराज स्वीकारणारे राजस्थान हे पहिले राज्य होय. (२ ऑक्टोबर १९५९).
* पंचायतराजद्वारे भारतातील पहिली ग्रामपंचायत नागोरा जिल्ह्य़ात (राजस्थान) स्थापन झाली.
* पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र ९ वे राज्य होय.
* महाराष्ट्रात पंचायतराज १ मे १९६२ रोजी सुरू झाले.
* पंचायतराज रचनेतील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या दोन्हीतील मधला दुवा म्हणजे पंचायत समिती होय.
* जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि ग्रामपंचायतीचे सरपंच या पदावर काम करणाऱ्या महिलांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करताना २/३ ऐवजी ३/४ बहुमताची आवश्यकता असते.
* महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत- अकलूज
* आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका – पिंपरी-चिंचवड
* जिल्हा व नियोजन मंडळाचा सचिव- जिल्हाधिकारी
* पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीतकमी २१ वर्षे पूर्ण असावे लागते.
* ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो.
* मंडल पंचायत ही संकल्पना प्रथम अशोक मेहता समितीने मांडली.
* जिल्हाधिकाऱ्यास जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कारभारात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येऊ नये, अशी महत्त्वपूर्ण शिफारस वसंतराव नाईक यांच्या समितीने केली होती.
* भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मिळतो.