निसर्गातील घडामोडींबद्दल ज्ञान प्राप्त करणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे हे दोन भिन्न घटक आहेत. त्यापैकी पहिल्यास विज्ञान म्हणतात तर दुसऱ्यास तंत्रज्ञान म्हणतात. व्याख्या- १) थॉर्न क्राईड- औद्योगिक कलेचे विज्ञान म्हणजे तंत्रज्ञान. २) एडवर्ड बोनो- ज्ञानाच्या उपयोजनातून काहीतरी उपयुक्त निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे तंत्रज्ञान होय.
थोडक्यात, पण महत्त्वाचे-
*‘देवी’ या रोगावर परिणामकारक लस कोणी शोधून काढली? -एडवर्ड जेन्नर
*सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात?- ७२
*मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? -३७ अंश सेल्सिअस
*कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वाना लागू पडते?- ओ
*‘पेनिसिलिन’चा शोध कोणी लावला?- सर अलेक्झांडर प्लेिमग
*सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला रोज किती कॅलरीजची जरुरी असते?- २५००
*पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधून काढली?- सॉल्क जोनास एडवर्ड
*‘होमिओपॅथी’चा शोध कोणी लावला? -सॅम्युअल हॅनेमन
*जगातील पहिली टेस्ट टय़ूब केव्हा व कोठे जन्मास आली? -१९७८, इंग्लंड.
*हृदयरोपण शस्त्रक्रिया भारतात प्रथम कोणी केली? -डॉ. पी. के. सेन
*‘इन्शुलिन’ या औषधाचा शोध कोणी लावला?- एफ. बॅटिंग
*कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो?- रेबीज
*सूर्यकिरणांमुळे कोणते जीवनसत्त्व मिळते? -जीवनसत्त्व ‘ड’
*मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते? -२०६
*मानवी शरीरातील स्नायूंची संख्या किती असते?- सुमारे ६३०
*रक्तगटाचा शोध कोणी लावला?- कार्ल लँडस्टीनर
*मानवी शरीरातील छातीच्या बरगडय़ांची संख्या किती असते?- २४
*मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते? -३३
*वनस्पतींनाही भावना, संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ कोण? -जगदीशचंद्र बोस
*सर्वात हलका वायू कोणता?- हेलियम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा