१) खालील वाक्यासाठी योग्य पर्याय लिहा
मनुष्य अमर कधी होतो?
ए) घरासाठी मरण आले तर, बी) सत्कार्यासाठी मरण आले तर, सी) मित्रासाठी मरण आले तर, डी) वाईट कार्यासाठी मरण आले तर
२) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
दररोज प्रसिद्ध होणाऱ्या पत्रकास ….. म्हणतात
ए) साप्ताहिक, बी) पाक्षिक, सी) मासिक, डी) दैनिक
३) खालील वाक्याचा प्रकार ओळखा
‘मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो’
ए) मिश्रवाक्य, बी) केवलवाक्य, सी) प्रश्नार्थी वाक्य, डी) संयुक्त वाक्य
४) उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा – ‘किती सुंदर दृश्य आहे हे!’
ए) हे दृश्य सुंदर नाही, बी) हे सुंदर दृश्य सर्वानी पाहावे, डी) हे दृश्य फारच सुंदर आहे, डी) किती सुंदर दृश्य दिसते
५) वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा – शिकस्त करणे
ए) खूप काम करणे, बी) फजिती होणे, सी) मनाप्रमाणे होणे, डी) खूप प्रयत्न  करणे
६) म्हणीचा योग्य अर्थ सांगा – नाव सोनुबाई, हाती कथलाचा गोळा
ए) नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे, बी) दुसऱ्याला नावे ठेवणे, सी) सोन्याचा भाव वाढणे, डी) काहीच न करणे
७) खालील शब्दाची विभक्ती ओळखा. योग्य पर्याय निवडा- ‘राजाचा’
ए) पंचमी, बी) षष्ठी, सी) प्रथमा, डी) तृतीया
८) पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत?
ए) ने, ए, शी,  बी) स, ला, ते, सी) ऊन,  हून, डी) चा, ची, चे
९) ‘प्र’ उपसर्ग लावून खालीलपैकी कोणता शब्दसमूह तयार होईल?
ए) डर, दम, मुदत, इनाम, बी) निरोगी, निनावी, नितळ, निकोप, सी) हजर, सरकार, सरपंच, सरदार, डी) भात, मुख, गती, बळ
१०) महा+उत्सव या संधिविग्रहातून कोणता शब्द  बनेल?
ए) महोत्सव, बी) महाउत्सव, सी) महुत्सव, डी) महानोत्सव
११) ‘उमेश’ या शब्दाचा योग्य संधिविग्रह करा
ए) उमे+श, बी) उमा+ईश, सी) उम+इश, डी) उमाई+श
१२) ‘समुद्र’ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा
ए) पाणी, बी) नदी, सी) दर्या, डी) घन
१३) वाक्याचा प्रकार ओळखा – पाऊस पडावा व हवेत गारवा यावा
ए) स्वार्थी, बी) विधानार्थी, सी) आज्ञार्थी, डी) संकेतार्थी
१४) खाली दिलेला शब्द व त्याचे दोन किंवा अधिक अर्थ दर्शविणाऱ्या शब्दांचे गट दिले आहेत. त्यातील अचूक अर्थाचा गट ओळखा.
ए) वस्तूचा दर, भक्तिभाव व श्रद्धा, बी) वस्तू, देवळात जाणे, सी) वस्तू, पैसा, डी) सामान, किंमत
१५)  खाली दिलेला शब्द व त्याचे दोन किंवा अधिक अर्थ दर्शविणाऱ्या शब्दांच्या  गटामधून अचूक अर्थाचा गट ओळखा- ‘दल’.
ए) बेल, पाने, फुले, बी) पाकळी, पराग, वनस्पतीचे  पान, सी) फूल, पान, झाड, डी) झाड, झुडूप, रोप
१६) ‘केकावली’ ही प्रसिद्ध रचना …. या पंडित कवीने केली आहे.
ए) संत नामदेव, बी) रामदासस्वामी, सी) वामन पंडित, डी) मोरोपंत
१७) ‘गझल’ हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचे श्रेय …. यांच्याकडे जाते.
ए) आरती प्रभू, बी) माधव ज्युलियन, सी) कवी यशवंत, डी) ग. दि. माडगूळकर
१८) निबंध लिहिताना… हे अध्यापन सूत्र वापरणे योग्य होय
ए) मूर्ताकडून अमूर्ताकडे, बी) पूर्णाकडून भागाकडे, सी) पृथक्करणाकडून संयोजनाकडे, डी) विशिष्टाकडून सामान्याकडे
१९) व्याकरणातील ‘नाम’ शिकविल्यानंतर ‘विद्यार्थी नामाचा वाक्यात उपयोग करतो’ हे विद्यार्थ्यांचे ….. होय
ए) ज्ञान, बी) आकलन, सी) मूल्यमापन, डी) उपयोजन
२०) विद्यार्थ्यांना मूकवाचनापूर्वी हेतूप्रश्न देण्यामागचा उद्देश कोणता असतो?
ए) विद्यार्थ्यांला निश्चित दिशेने वाचनास प्रवृत्त करून आशयाप्रत पोहोचविणे, बी) विद्यार्थ्यांला पुस्तकातील उत्तरे शोधण्याची सवय लावणे, सी) विद्यार्थ्यांला वर्गात शांतता पाळण्यास भाग पाडणे, डी) अ व ब मधील दोन्ही
उत्तरे : १) बी,  २) डी, ३) बी,  ४) सी, ५) डी, ६) ए, ७) बी, ८) सी, ९) डी, १०) ए, ११) बी, १२) सी, १३) डी,  १४) ए, १५) बी, १६) डी, १७) ए,  १८) सी, १९) डी, २०) ए

neena kulkarni
“मी जिवंत आहे”, निधनाची अफवा पसरल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची पोस्ट, म्हणाल्या…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
prakash raj son death
पाच वर्षीय मुलाच्या आकस्मिक निधनाने खचले होते प्रकाश राज, म्हणाले, “दुःख वाटण्यापेक्षा…”
Sanjay Rathod case, death of young woman,
संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल
sandha badaltana manprasthashram
सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम
number of people thinking about suicide due to depression is increasing
तुम्ही निराश आहात? मनात आत्महत्येचा विचार येतोय… मग हे वाचाच! कारण…
dombivli school boy died
डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू, एक विद्यार्थी गंभीर जखमी