इतिहास : वर्तमानकाळ व भूतकाळ यामधील कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास. भूतकाळातील घटना का घडली, तिचे परिणाम यांचा शोध घेऊन तिची नोंद इतिहासात केली जाते.
इ.स. १५९९ मध्ये इंग्लंडमधील व्यापाऱ्यांच्या एका गटाने ‘ईस्ट इंडिया कंपनी’ नावाची एक व्यापारी कंपनी स्थापन केली. या कंपनीस इंग्लंडची तत्कालीन राणी एलिझाबेथ हिने ३१ डिसेंबर १६०० रोजी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद
दिली.
भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज थॉमस स्टीव्हन्स.
लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत इ.स. १८५३ मध्ये ‘मुंबई ते ठाणे’ हा भारतातील पहिला लोहमार्ग उभारला गेला.
सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला ‘सत्यार्थप्रकाश’ हा ग्रंथ दयानंद सरस्वती यांनी लिहिला.
‘रास्त गोफ्तार’ म्हणजे ‘खरी बातमी’ या नावाने साप्ताहिक दादाभाई नौरोजी यांनी काढले.
वि. दा. सावरकर यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होय.
न. र. फाटक या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून १८५७ चा उठाव म्हणजे ‘शिपाई गर्दी’ होय.
राजा राममोहन रॉय – ‘भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक’ व ‘आधुनिक भारताचा निर्माता’.
स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीचे धडाडीचे पुरस्कर्ते लोकमान्य टिळक होय.
सरदार पटेलांची तुलना बिस्मार्क (जर्मनी) यांच्याशी केली जाते.
महाराष्ट्रात सातारा जिल्हा आणि परिसरात ‘प्रतिसरकार’ किंवा ‘पत्री सरकार’ची स्थापना नाना पाटील यांनी केली.
नागरिकशास्त्र व प्रशासन: ‘नागरिकशास्त्र’ म्हणजे मनुष्याचे भूतकालीन, वर्तमानकालीन, भविष्यकालीन तसेच स्थानिक, राष्ट्रीय आणि विश्वस्पर्शी जीवन यांचा अभ्यास.
‘पंचायतराज’ हे स्वप्न महात्मा गांधी यांनी बाळगले.
पंचायतराज स्वीकारणारे पहिले राज्य राजस्थान (२ ऑक्टोबर १९५९).
पंचायतराजद्वारे भारतातील पहिली ग्रामपंचायत नागोरा जिल्ह्य़ात (राजस्थान) येथे पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र ९ वे राज्य होय.
महाराष्ट्रात पंचायतराज.. १ मे १९६२ सुरू झाले.
पंचायतराज रचनेतील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या दोन्हीतील मधला दुवा म्हणजे पंचायत समिती होय.
जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि ग्रामपंचायतीचे सरपंच या पदावर काम करणाऱ्या महिलांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करताना २/३ ऐवजी ३/४ बहुमताची आवश्यकता असते.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत- अकलूज.
राज्य, देश व आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मनपा- पिंपरी-चिंचवड
जिल्हा व नियोजन मंडळाचा सचिव- जिल्हाधिकारी.
परिसर अभ्यास व भूगोल : परिसर व मानव यांच्यातील आंतरक्रियांचा विविधांगी अभ्यास म्हणजेच ‘परिसर अभ्यास’ होय. पृथ्वीवर घडणाऱ्या नैसर्गिक व भौतिक घडामोडींचा मानवाच्या संदर्भात र्सवकष विचार करणारे शास्त्र म्हणजे ‘भूगोल’ होय.
भारतातील प्रमुख पर्वतरांगा अथवा पर्वतप्रणालींची संख्या ७ आहे.
आकारमानाचा विचार करता जगात सातव्या स्थानावर असलेला भारत लोकसंख्येचा विचार करता जगातील दुसरा देश आहे.
तांदळाचे सर्वाधिक उत्पादन देणारे भारतातील राज्य पश्चिम बंगाल.
भारतातील आसाम या राज्याची सीमा जास्तीत जास्त म्हणजे सात राज्यांना भिडलेली आहे.
भारतीय द्वीपकल्पापासून सुमारे ७०० कि.मी. अंतरावर बंगालच्या उपसागरात असलेल्या अंदमान-निकोबार या बेट समूहावरील ‘इंदिरा गांधी पॉइंट हे भारतीय संघराज्याचे अतिदक्षिणेकडील टोक होय.’
भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण गंगानगर (राजस्थान)
आकारमानाचा विचार करता ‘राजस्थान’ हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे, तर गोवा हे सर्वात लहान राज्य आहे.
गंगा-ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन म्हणून ओळखले जाते.
१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले.
‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर अहमदनगर व नाशिक या जिल्ह्य़ांच्या सीमेवर आहे.
बांबूच्या वनांचे सान्निध्य लाभलेल्या ‘देसाईगंज’ या गडचिरोली जिल्ह्य़ातील ठिकाणी बांबूच्या लगद्यापासून कागद बनविण्याचा कारखाना उभारला गेला आहे.
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी व इंडियन ड्रग लॅबोरेटरी या संस्था पुणे येथे आहेत.
क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे, तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा होय.
‘रोशा’ जातीचे गवत राज्यात धुळे, नंदूरबार व जळगाव या जिल्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर आढळते.
बिडय़ा तयार करण्यासाठी तेंदूची (टेंभुर्णीची) पाने वापरतात. तेंदूची झाडे नागपूर, गोंदिया व भंडारा या जिल्ह्य़ांतील जंगलांमध्ये विपुल प्रमाणावर आढळतात.
प्रवरा नदीवरील भंडारदरा हे धरण ‘विल्सन बंधारा’ म्हणूनही ओळखले जाते.
– प्रा. सचिन परशुराम आहेर,
सेवासदन अध्यापक महाविद्यालय