दहावीत सर्वाधिक विद्यार्थ्यांची ‘विकेट’ काढणारा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या गणिताचे ‘प्रमेय’ यंदा सुटल्याने या विषयाचा निकाल चांगलाच उंचावला आहे. गेल्या वर्षीपर्यंत ७५ टक्क्य़ांच्या आसपास असलेल्या गणिताच्या निकालाने यंदा चांगलीच उसळी घेत तब्बल ९० टक्के विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. गणिताच्या निकालाने एकदम १५ टक्क्य़ांहून अधिक घेतलेली उडी अनेकांना कोडय़ात टाकणारी ठरली आहे. गणिताचा हा निकाल तुलनेत ‘सोपा’ समजल्या जाणाऱ्या ‘सामान्य गणिता’पेक्षाही खूप जास्त आहे हे विशेष. कारण, सामान्य गणित आल्यापासून गणिताचा निकाल हा तुलनेत कमीच राहिला आहे.
गणितासाठी १५० ऐवजी आता १०० गुणांची परीक्षा घेतली जाते. त्यातून गणिताच्या अभ्यासक्रमही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगलीच काटछाट करण्यात आली होती. ‘प्रमेयांचा (थेरम) बहुतांश विद्यार्थ्यांना किचकट आणि कठीण वाटणारा भाग या वर्षी अभ्यासक्रमातून वगळण्यात आला होता. त्यामुळेही कदाचित गणिताचा निकाल उंचावला असावा,’ अशी शक्यता मुंबईतील गणिताचे एक शिक्षक विलास परब यांनी व्यक्त केली. तसेच, ‘प्रश्नपत्रिकेची लांबी कमी झाल्याने व अभ्यासक्रम कमी करण्यात आल्याने परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करणेही तुलनेत सोपे झाले आहे. काय वगळायचे आणि काय करायचे या बाबतीतले विद्यार्थ्यांचे अंदाजही नेमके आल्याने त्याचा फायदा झाला आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
 ‘गणितासाठी अंतर्गत मुल्यांकन म्हणून १०० पैकी २० गुणांसाठीची परीक्षा शाळा स्तरावरच घेण्यात आली होती. म्हणजे लेखी परीक्षा ही केवळ ८० गुणांसाठीच झाली. त्यातून अभ्यासक्रमही कमी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना गणितात उत्तीर्ण होण्याइतपत कामगिरी करणे शक्य झाले,’ अशी प्रतिक्रिया पुण्यातील एका गणिताच्या शिक्षिकेने व्यक्त केली. ‘यावेळी गणिताचा पेपर तुलनेने सोपा होता. त्याचप्रमाणे यावर्षी भूमितीच्या अभ्यासक्रमातून कॉन्व्हर्स प्रमेयांचा मुलांना कठीण जाणारा भाग वगळण्यात आला होता. त्यामुळेच निकाल मोठय़ा प्रमाणावर वाढलेला दिसतो आहे,’ अशी प्रतिक्रिया पुण्याच्या अहिल्यादेवी प्रशालेच्या अपर्णा गरूड यांनी व्यक्त केली.

निकालाची वैशिष्टय़े
* सहा वर्षांतील सर्वाधिक निकाल. नव्वद टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दहा हजारांनी वाढ. विशेष श्रेणी (७५ टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण) मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ
* गणित विषयाची परीक्षा पहिल्यांदाच शंभर गुणांची. गणितात उत्तीर्ण झालेल्यांमध्ये तब्बल १३ टक्क्य़ांची वाढ, गणिताचा निकाल ९०.५४ टक्के
* विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा निकाल ५ टक्क्य़ांनी घटला, यावर्षी ९२.६४ टक्के. ’ग्रामीण भागाचा निकाल वाढले
* मुंबई विभागाच्या निकालात घट. मुली आघाडीवर. जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची परीक्षा

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

१०५ शाळांचा शून्य टक्के निकाल
मुंबई : यंदा दहावीचा निकाल चांगला लागला असला तरी राज्यातील १०५ शाळांचा निकाल शून्य टक्के इतका लागला आहे. यामध्ये सर्वाधिक ४५ शाळा मुंबईतील तर पुण्यातील ३५ शाळांचा समावेश आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील २० हजार ७३१ शाळांमधील विद्यार्थी बसले होते. यापैकी तीन हजार ९९४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे तर आठ हजार २७ शाळांचा निकाल नव्वद टक्क्यांहून अधिक लागला आहे. मुंबई विभागात ८०१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. शून्य टक्के निकाल जाहीर झालेल्या शाळांची चौकशी करून त्या चौकशीचा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

आनंदवनाचे ९७ खणी यश
मुंबई : दहावीच्या परीक्षेत आनंदवनातील दृष्टीहीन आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक यश मिळविले आहे. आनंदवनातील ३६ विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल एकूण ९७ टक्के आहे. कर्णबधीर असलेल्या १६ पैकी १४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याची कामगिरी बजावली आहे. यात एका विद्यार्थ्यांने सर्वाधिक ७२ टक्के गुण मिळविले आहेत. दोघा विद्यार्थ्यांची प्रथम श्रेणी मात्र थोडक्यात हुकली. येथून २० दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ जण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

चिन्मयी मटांगेचे उल्लेखनीय यश
रत्नागिरीतल्या पटवर्धन हायस्कूलची चिन्मयी मटांगे या विद्यार्थीनीने दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९६ (९९.२ टक्के) गुण मिळविले आहेत. संस्कृत, गणित आणि विज्ञान या तीन विषयांमध्ये तिने १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.

Story img Loader