शासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी गेल्या तीन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. वेळप्रसंगी कर्ज काढून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या आर्थिक वर्षांतही शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्क हे प्रत्येक वर्षांसाठी लाखो रुपयांच्या घरात आहे. प्रवेश देताना विद्यार्थ्यांला हे शुल्क भरावे लागते आणि त्यानंतर शासनाकडून या शुल्काची प्रतीपूर्ती केली जाते. मुळातच अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी कर्ज काढले आहे. त्यामुळे आता पुढील वर्षांचे शुल्क कसे भरायचे असाही प्रश्न अनेक विद्यार्थ्यांपुढे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा