महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाबाबत काही आक्षेप असल्यास, पुनर्मूल्यांकन किंवा छायाप्रतीसाठी अर्ज करण्यासाठी २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या वर्षी प्रथमच पुनर्मूल्यांकनाचे निकाल लावल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. निकालाबाबत काही आक्षेप असल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे. पुनर्मूल्यांकन किंवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्यासाठी २४ जूनपर्यंत मुदत आहे. गुणपडताळणीचा निर्णय ३० दिवसांमध्ये मुख्याध्यापकांकडे कळवण्यात येणार आहे.
पुनर्मूल्यांकनासाठीचा अर्जाचा नमुना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निकालाबाबतचे आक्षेप किंवा पुनर्मूल्यांकन, छायाप्रतीसाठीचे अर्ज परिषदेकडे पोस्टाने पाठवायचे आहेत किंवा प्रत्यक्ष द्यायचे आहेत. पुनर्मूल्यांकन किंवा छायाप्रतीसाठीचे अर्ज आणि याबाबतची
अधिक माहिती परिषदेच्या http://www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

Story img Loader