या प्रश्नामध्ये एखादा प्रसंग, घटना, छोटीशी कथा, वर्णनात्मक अथवा विचारप्रवर्तक परिच्छेद असतो. प्रथम उतारा एकाग्रचित्ताने समजून वाचून त्यातील घटना, प्रसंग यांचा क्रम लक्षात घ्या. प्रश्न आणि उत्तराचे चारही पर्याय नीट वाचा. पर्यायी उत्तरांबाबत संभ्रम असल्यास उताऱ्यातील नेमका संबंधित भाग व पर्याय पुन्हा वाचल्यास अचूक उत्तर निश्चित करता येते.
खालील परिच्छेद वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा-
एकदा किंवा दोनदाच नव्हे तर मी त्यांना अनेकदा भेटलेले पाहिले. काबुलीवाल्याने मुलांना वाटणारी पहिली भीती हुशारीने काजू आणि बदाम यांची लाच देवून घालवली आणि दोघे आता छान दोस्त झाले. त्यांच्यामध्ये  खूप गमजेदार विनोद होत असत. त्यामुळे त्यांची खूप करमणूक होत असे. मिनी त्याच्यासमोर बसून त्याच्या प्रचंड अंगकाठीकडे बघत व तिच्या छोटय़ाशा  प्रतिष्ठेने आणि चेहऱ्यावर हास्य आणून सुरू करी, ‘अहो काबुलीवाले! काबुलीवाले! तुमच्या पोतडीत तुम्ही काय आणले आहे?’
आणि तो त्याच्या पहाडी अनुनासिक आवाजात उत्तर देई, ‘एक हत्ती’. जरी यात फारसा विनोद नसला तरी दोघेही यात आनंद घेत असत आणि मला या मुलीचे मोठय़ा माणसाशी बोलणे नेहमी विलक्षण चित्तवेधक वाटत असे.
मग काबुलीवालाही वेळ न घालवता तिला विचारी, ‘ए पोरी, सांग बरं, तू तुझ्या सासऱ्याच्या घरी कधी जाणार?’
आता तसं पाहिलं तर जवळजवळ प्रत्येक लहान बंगाली कुमारिकेने सासऱ्याच्या घराविषयी ऐकलेले असे, पण आम्ही थोडे नवमतवादी असल्याने या गोष्टी आमच्या लहानग्यापासून लांब ठेवल्या होत्या. त्यामुळे मिनी या प्रश्नामुळे थोडीशी गोंधळात पडायची. पण ती तसे दाखवत नसे आणि खुबीने विचारायची, ‘तुम्ही तिकडे जाता का?’
परंतु काबुलीवाल्याच्या समाजात हे सर्वाना माहिती होते की ‘सासऱ्याचे घर’ या शब्दाला दोन अर्थ होते. तो तुरुंगाकरिता किंवा जेथे आपली कपर्दीकही न खर्च होता चांगली काळजी घेतली जाते, त्यासाठी वापरण्याचा  सौम्य शब्द होता.
१) …पण आम्ही जरा नवमतवादी असल्याने या गोष्टी.. या वाक्यातील  ‘आम्ही’ कोणासाठी वापरला आहे?
ए) मिनीचे पालक, बी) निवेदक आणि काबुलीवाला, सी) बंगालमधील तुरुंगाधिकारी, डी) काबुलीवाला आणि त्याचे मित्र
२) सासऱ्याचे घर हा शब्दप्रयोग कशासाठी वापरला आहे?
ए) काबुलीवाल्याचे घर, बी) तुरुंग, सी) मिनीचे सासर, डी) नवऱ्याचे घर
३) हा उतारा  काय दाखवतो?
ए) निवेदकाच्या मुलींची काळजी, बी) काबुलीवाल्याने घेतलेले कष्ट, सी) अभावितपणे प्रौढ आणि निष्पाप मुलांत वाढीस लागलेली मैत्री, डी) मिनीचे बुद्धिचातुर्य
४) ‘मिनी चेहऱ्यावर हास्य आणून..’ यावरून मिनीचा कोणता स्वभाव स्पष्ट होतो?
ए) खोडकर आणि उतावळा, बी) मोहक आणि आकर्षक, सी) आश्चर्य आणि अविश्वास, डी) हसरा आणि आनंदी
५) गोंधळात पडणे याच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा
ए) ठाम असणे, बी) डळमळीत असणे, सी) कोडय़ात  पडणे, डी) घोटाळ्यात पडणे
कवितेचे आकलन
कवितेतील लयबद्ध मांडणीतील मोजक्या शब्दात मोठा आशय दडलेला असतो. कवितेची मध्यवर्ती कल्पना व आशयघन ओळींचा अर्थ समजण्यासाठी कविता काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांचा अचूक पर्याय निवडा.
शुभारंभ करी शक गणनेचा
करुनि पराभव दुष्टजनांचा
शालिवाहन नृपति आठवा
चैत्रमासिका गुढीपाडवा
किरण कोवळ रविराजांचे
उल्हसित करते मन सर्वाचे
प्रेमभावना मनी साठवा
हेच सांगतो  गुढीपाडवा
घराघरांवर उभारूया गुढी
मनामनांतील सोडून अढी
संदेश असा हा देई मानवा
चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा
नववर्षांचा सण हा पहिला
वसंत ऋतूने सुरु जाहला
पण करूया मनी नवा
हेच सांगतो गुढीपाडवा
– कवयित्री मंगला गोखले
६) शक गणनेचा शुभारंभ कोणी केला?
ए) रामाने, बी) शिवाजीराजाने, सी) शालिवाहन राजाने, डी) अकबर बादशाहने
७) कोणाचे किरण कोवळे आहेत?
ए) सूर्याचे, बी) चंद्राचे, सी) चांदण्याचे, डी) रविराजाचे
८) घराघरांवर काय उभारूया, असे कवयित्री म्हणतात?
ए) गुढी, बी) पताका, सी) ध्वज, डी) झेंडा
९) नववर्षांचा पहिला सण कोणता?
ए) रंगपंचमी, बी) गुढीपाडवा, सी) होळी, डी) नागपंचमी
१०) ‘केकावली’ ही प्रसिद्ध रचना …. या पंडित  कवीने  केली आहे
ए) संत नामदेव, बी) रामदासस्वामी, सी) वामन  पंडीत, डी) मोरोपंत
उत्तरे:  १) ए, २) बी, ३) सी, ४) डी, ५) ए ६) बी, ७) सी, ८) डी, ९) ए, १०) बी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा