सामान्य अध्ययन-१
विषय : पर्यावरण
प्र. ४०.    चुकीचे विधान ओळखा.
पर्याय :    अ)    ‘हवामान बदल’ यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर सहमती झालेला पहिला प्रयत्न म्हणून ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’- १९९२ (UNF CCC) च्या स्वीकाराचा उल्लेख करावा लागेल.
    ब)    UNF CCC- 1992 नुसार जगातील राष्ट्रांची औद्योगिक व विकसनशील अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली.
    क)    १९९७ च्या क्योटो प्रोटोकॉलनुसार सभासद राष्ट्रांवर कायदेशीर बंधन लागू करण्यात आली.
    ड)    क्योटो प्रोटोकॉलनुसारच्या क्लीन डेव्हल्पमेंट मॅकॅनिझम (CDM) अंतर्गत सर्वाधिक प्रकल्प असलेल्या देशात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
सामान्य अध्ययन-१
सामान्य विज्ञान/ तंत्रज्ञान
प्र. ४१.    ‘राष्ट्रीय’ ई-गव्हर्नन्स’ कार्यक्रमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
पर्याय :    अ)    राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमातील पहिले पाऊल म्हणून MCA-21 या प्रकल्पाचा उल्लेख होतो.
    ब)    MCA-21 हा प्रकल्प १८ मार्च २००६ रोजी सुरू करण्यात आला.
    क)    MCA-21 हा प्रकल्प ‘कंपनी अफेअर्स’ या मंत्रालयाद्वारे राबविला गेला.
    ड)    MCA-21 हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी ‘विप्रो’ या कंपनीवर टाकण्यात आली होती.
प्र. ४२.    हवेतील प्रकाशाचा वेग कोणत्या रंगात महत्तम असतो?
पर्याय :    अ) लाल रंग    ब) जांभळा रंग
    क) निळा रंग    ड) सर्व रंगांमध्ये सारखा असतो.
(क्रमश:)

Story img Loader