प्र. 1. चित्ता या प्राण्याबद्दल कोणते विधान बरोबर आहे?
अ) 1952 मध्ये भारतात चित्ता हा प्राणी नामशेष म्हणून घोषित करण्यात आला.
ब) चित्ता हा प्राणी शुष्क प्रदेशिय परिसंस्थामध्ये आदिवास करणारा प्राणी आहे.
पर्याय : 1) अ विधान बरोबर 2) ब विधान बरोबर
3) अ व ब विधान बरोबर 4) अ व ब विधान चूक
प्र. 2. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठय़ा आकाराचा देशांतर्गत खाऱ्या पाण्याचा दलदलीय प्रदेश (Inland saline wetland) आहे?
पर्याय : अ) हरियाणा ब) गुजरात
क) मध्यप्रदेश ड) स्पष्टीकरण प्रदेश
प्र. 3. संरक्षित क्षेत्रांच्या खालीलपकी कोणत्या प्रकारात स्थानिक लोकांना जैववस्तुमान गोळा करण्यास व वापरण्यास परवानगी नसते?
पर्याय : अ)वन्यजीव अभयारण्ये
ब) राष्ट्रीय उद्याने
क) जीवावरण राखीव क्षेत्र
ड) रामसर यादीमध्ये समाविष्ट दलदलीय प्रदेश
प्र. 4. खालील कोणत्या समूहातील प्राणी धोकाग्रस्त (Endangered) बनलेले आहेत?
पर्याय : अ) माळढोक पक्षी, कस्तुरी हरीण, रेड पांडा, वन्य गाढव
ब) काश्मिर स्टॅग, चितळ, निलबल, माळढोक पक्षी
क) हिम चित्ता, स्वॅम्प हरिण, ऱ्हिस माकड, सारस (बगळा)
ड) लायन टेल्ड वानर, निलबल, हनुमान माकड, चितळ
प्र. 5. एकेकाळी देशात मुबलकपणे आढळणारी गिधाडे आजकाल दुर्मिळ झाली आहेत. याचे कारण म्हणजे..
पर्याय : अ) घातक रोगाचा प्रसार
ब) काही नवीन प्रजातींच्या शिरकावामुळे त्यांची
घरटय़ांची स्थाने नष्ट झाली.
क) अन्नाची दुर्भिक्षता
ड) जनावरांमध्ये वापरले जाणारे एक विशिष्ट
वेदनाशामक औषध
प्र. 6. ओरिक्स (Oryx) आणि चिरू (Chiru) या काळविटांमध्ये काय फरक आहे?
पर्याय : अ)ओरिक्स हा उष्ण आणि शुष्क प्रदेशांमध्ये राहण्यास अनुकूल आहे, तर चिरू हा स्टेपीज आणि शीत उंच पर्वतांमधील निम-वाळवंटी प्रदेशात राहण्यास अनुकूल आहे.
ब) ओरिक्सची शिकार शिंगांसाठी केली जाते, तर चिरूची शिकार कस्तुरीसाठी केली जाते.
क) ओरिक्स हा केवळ पश्चिम भारतात, तर चिरू हा केवळ ईशान्य भारतात सापडतो.
ड) वरील सर्व पर्याय अयोग्य आहेत.
प्र. 7. खालील प्रदेशांचा विचार करा.
अ) पूर्व मेडिटेरिअन प्रदेश ब) पूर्व हिमाचल
क) वायव्य ऑस्ट्रेलिया
वरील पकी जैवविविधतेचे हॉट स्पॉट कोणते?
पर्याय : 1) फक्त अ
2) अ व ब
3) ब व क
4) अ, ब, क
प्र. 8. खालील विधानांचा विचार करा.
अ) राष्ट्रीय उद्यांनाच्या सीमा कायद्याने निश्चित केल्या जातात.
ब) वन्यजीव अभयारण्यात मर्यादित जैविक हस्तक्षेपास परवानगी असते.
क) जीवावरण राखीव क्षेत्र हे काही निवडक प्राणी आणि वनस्पती प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी निर्माण केले जाते.
वरीलपकी योग्य विधान कोणते?
पर्याय : 1) फक्त अ 2) अ व ब
3) अ व क 4) अ, ब, क
प्र. 9. दोन महत्त्वाच्या नद्या, ज्यांपकी एकीचा उगम झारखंडमध्ये होतो (आणि ओडिशामध्ये दुसऱ्या नावाने प्रसिद्ध असणारी) आणि दुसरीचा उगम
ओडिशामध्ये होतो. या नद्या किनारपट्टीच्या काही अंतर अलीकडे संगम पावतात. हा प्रदेश महत्त्वाचे वन्यजीव व जैवविविधता स्थान आणि संरक्षित क्षेत्र
आहे. हा प्रदेश खालीलपकी कोणता आहे?
पर्याय : अ) सिमलीपाल ब) भितरकणिका
क) गोपालपुर-ऑन-सी ड) चंदीपूर-ऑन-सी
प्रश्नांची उत्तरे : प्र. १- २, प्र. २- ब, प्र. ३- ब, प्र. ४- अ,
प्र. ५- ड, प्र. ६- अ, प्र. ७- ४, प्र. ८- २ प्र. ९- ब.
क्रमश:
यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न : पर्यावरणविषयक प्रश्न
प्र. 1. चित्ता या प्राण्याबद्दल कोणते विधान बरोबर आहे? अ) 1952 मध्ये भारतात चित्ता हा प्राणी नामशेष म्हणून घोषित करण्यात आला. ब) चित्ता हा प्राणी शुष्क प्रदेशिय परिसंस्थामध्ये आदिवास करणारा प्राणी आहे. पर्याय : 1) अ विधान बरोबर 2) ब विधान बरोबर 3) अ व ब विधान बरोबर 4) अ व ब विधान चूक
First published on: 30-03-2013 at 05:54 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc prelims practice question environmental questions