प्र. 10. भारतातील एक वालुकामय आणि खारपड क्षेत्र एका वन्य प्राणीप्रजातीला अधिवास पुरवते. या प्राण्यास त्या क्षेत्रात कुठलाही नैसर्गिक भक्षक किंवा शत्रू
नाही. परंतु अधिवासाच्या होणाऱ्या ऱ्हासामुळे हा प्राणी संकटग्रस्त बनला आहे. खालीलपकी हा प्राणी कोणता असू शकतो.
पर्याय : अ) भारतीय वन्य म्हैस ब) भारतीय वन्य बोअर
क) भारतीय वन्य गाढव ड) भारतीय गॅझेल (कुरंग)
प्र. 11. खालीलपकी कोणती इन-सितू संवर्धन पद्धती नाही?
पर्याय : अ) जीवावरण राखीव क्षेत्र  ब) वनस्पतीय उद्यान
क) राष्ट्रीय उद्यान ड) वन्यजीव अभयारण्य
प्र. 12. खारफुटीची वने किनारपटटीय आपत्तींपासून संरक्षण करणाऱ्या खात्रीलायक सुरक्षा भित्तिका ठरू शकतात, याची जाणीव लोकांना 2004 मधील सुनामी वादळामुळे झाली. खारफुटीची वने कशाप्रकारे सुरक्षा भित्तिका म्हणून कार्य करतात?
पर्याय : अ) खारफुटी वनांतील दलदली क्षेत्रे, ज्यांमध्ये लोक राहत नाहीत किंवा काय्रे करत नाहीत, मानवी वसाहतींना समुद्रापासून अलग करतात.
ब) घट्ट मुळांमध्ये या वनांतील वृक्ष वादळ किंवा लाटांनी उन्मळून पडत नाहीत.
क) खारफुटीच्या वनांतील झाडे उंच आणि घनदाट असल्याने वादळ किंवा सुनामीदरम्यान लोकांना उत्तम निवारा पुरवितात.
ड) खारफुटीची वने लोकांना ज्याची गरज असते अशा अन्न आणि औषधे या दोन्हीही गोष्टी नैसर्गिक आपत्ती दरम्यान पुरवितात.
प्र. 13. निसर्ग व नैसर्गिक संसाधने संवर्धन संघ ((IUCN-International Union for Conservation of Nature & Natural Resources) द्वारा प्रकाशित रेड डाटा बुक्समध्ये कशाचा समावेश असतो?
अ) जैवविविधता हॉटस्पॉट्समधील स्थानविशिष्ट (Emdemic) वनस्पती आणि प्राणी प्रजाती.
ब) संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी प्रजाती.
क) निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी विविध देशांतील संरक्षित क्षेत्रे. योग्य पर्याय निवडा.
पर्याय : 1) अ व ब 3) ब व क
2) फक्त ब 4) फक्त क
प्र. 14. खालील सजीवांचा विचार करा.
अ) जीवाणू ब) बुरशी क) पुष्पीय वनस्पती
वरीलपकी कोणत्या सजीवांच्या काही प्रजाती जैवकीटकनाशके (Biopesticides) म्हणून वापरल्या जातात? योग्य पर्याय निवडा
पर्याय : 1) फक्त अ 3) ब व क
2) अ व क 4) अ, ब आणि क
प्र. 15. ओझोन अवक्षय घडविणाऱ्या क्लोरोप-लुरो कार्बनचा वापर कशासाठी होतो?
अ) प्लास्टिक फोम उत्पादन
ब) टय़ुबलेस टायर उत्पादन
क) काही इलेक्ट्रॉनिक्स भाग स्वच्छ करण्यासाठी
ड) एअरोसोल कॅन्समध्ये प्रेशरायिझग एजंट म्हणून
वरील योग्य पर्याय निवडा
पर्याय : अ) अ आणि क ब) फक्त ब
क) अ, क आणि ड ड) वरीलपकी सर्व
प्र. 16. भारत हा रामसर कराराचा सदस्य आहे. भारताने अनेक प्रदेश रामसर यादीत समाविष्ट केलेले आहेत. या प्रदेशांच्या योग्य देखरेखीसंदर्भात खालीलपकी
सर्वात योग्य विधान कोणते?
पर्याय : अ) रामसर क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप पूर्णपणे बंद करणे.
ब) परिस्थितिकीय दृष्टिकोनातून या क्षेत्रांचे संवर्धन करणे व केवळ पर्यटन आणि पुनर्निर्माणास परवानगी
क) काही काळाकरिता प्रत्येक रामसर क्षेत्राचे विशिष्ट निकषांच्या आधारे विशिष्ट काळासाठी परिस्थितिकीय दृष्टिकोनातून संवर्धन करणे आणि भावी पिढीला त्याचा शाश्वत वापर करू देणे.
ड) परिस्थितीकीय दृष्टिकोनातून सर्व रामसर क्षेत्रांचे संवर्धन आणि त्याचबरोरबर त्यांचा शाश्वत वापर.
पर्याय : अ) अ,ब आणि क ब) ब आणि क
क) क आणि ड ड) वरील पकी सर्व
प्रश्नांची उत्तरे : प्र. १०- क, प्र. ११- ब, प्र. १२- अ,
प्र. १३- २, प्र. १४- ४, प्र. १५- क, प्र. १६- ड.
क्रमश:
‘स्पर्धा परीक्षा गुरू’ हे स्वतंत्र, संपादकीय मजकुराचे सदर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा