प्र. 1. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) भूकंपाच्या प्राथमिक लहरी घन आणि द्रव्य माध्यमातून प्रवास करतात.
ब) भूकंपाच्या दुय्यम लहरी द्रव्य माध्यमातून प्रवास करीत नाहीत.
क) भूकंपाच्या प्राथमिक लहरींचा वेग दुय्यम लहरींपेक्षा 1.7 पटपेक्षा जास्त आहे.
पर्याय : 1) फक्त अ आणि ब 2) फक्त ब आणि क
3) फक्त अ आणि क 4) वरील सर्व बरोबर
प्र. 2. खालीलीपकी कोणती जोडी चुकीची आहे?
पर्याय : अ) भाबर : शिवालिक पर्वताच्या पायथ्याजवळील जाडीभरडी वाळू दगडगोटय़ांचा भाग
ब) तराई : दलदलीचा प्रदेश
क) भांगर : नवीन गाळाचे मैदान
ड) खादर : सखल प्रदेशातील नवीन गाळाचे मैदान
(* भांगर : जुने गाळाचे मैदान)
प्र. 3. प्रसिद्ध काश्मिर खोरे म्हणजे… या दोन पर्वतरांगेतील खोरे होय.
पर्याय : 1) झास्कर व लडाक रांगा
2) काराकोरम व लडाक डोंगररांगा
3) पीरपंजाल व झास्कर डोंगररांगा
4) यांपकी नाही
प्र. 4. पूर्व घाटातील टेकडय़ांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा?
पर्याय : 1) नल्लामल्ला, पालकोंडा, जावडी, शेवराई
2) शेवराई, जावडी, पालकोंड, नल्लामल्ला
3) शेवराई, जावडी, नल्लामल्ला, पालकोंडा
4) नल्लामल्ला, शेवराई, जावडी, पालकोंडा
प्र. 5. केरळ हे राज्य स्त्रियांना सर्वाधिक अनुकूल असे स्त्री- पुरुष प्रमाण दर्शवते तर…. हा केंद्रशासित प्रदेश स्त्रियांना सर्वाधिक प्रतिकूल असे स्त्री-पुरुष प्रमाण दर्शवतो?
पर्याय : 1) दीव-दमण 2) लक्षद्वीप 3) पुदुच्चेरी 4) दिल्ली
प्र. 6. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) केरळच्या किनारपट्टीवर दैनिक तापमान कक्षा कमी आढळून येते.
ब) थाग-ला, निती आणि लिपु लेक या खिंडी बृहद हिमालयातील सिक्कीम या राज्यात आढळून येतात.
पर्याय : 1) विधान अ बरोबर आहे.
2) विधान अ व ब बरोबर आहे.
3) विधान ब बरोबर आहे.
4) विधान अ व ब चूक आहे.
थाग- ला, निती आणि लिपु लेक या खिंडी उत्तराखंड या राज्यात आहेत.
प्र. 7. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) लेसर हिमालय व शिवालिक यांच्या दरम्यानचा सपाट कमी रुंदीचा वाळू गोटे यांसारख्या भरणाने व्याप्त प्रदेश भांगर म्हणून ओळखला जातो.
ब) अन्नाईमुडी हे दक्षिण भारतातील किंबहुना द्वीपकल्पीय भारतातील सर्वोच्च शिखर पश्चिम घाटाच्या अन्नामलाई या श्रेणीमध्ये वसलेले आहे.
पर्याय : 1) विधान अ बरोबर आहे.
2) विधान अ व ब बरोबर आहे .
3) विधान ब बरोबर आहे.
4) विधान अ व ब चूक आहे.
लेसर हिमालय व शिवालिक यांच्या दरम्यानचा सपाट कमी रुंदीचा वाळू गोटे यांसारख्या भरणाने व्याप्त प्रदेश डून म्हणून ओळखला जातो. उदा. डेहराडून
प्र. 8. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांगांमधील गुरुशिखर हे सर्वोच्च शिखर आहे.
ब) सायलेंट व्हॅली हा विवादास्पद प्रकल्प केरळ या राज्यात उभारणे नियोजित होते.
पर्याय : 1) विधान अ बरोबर आहे.
2) विधान अ व ब बरोबर आहे.
3) विधान ब बरोबर आहे.
4) विधान अ व ब चूक आहे.
प्रश्नांची उत्तरे : प्र. १- ४, प्र. २- क, प्र. ३- ३, प्र. ४- १, प्र.५- १, प्र. ६- १, प्र. ७- ३, प्र ८- २.
क्रमश:
– डॉ. जी. आर. पाटील
‘स्पर्धा परीक्षा गुरू’ हे स्वतंत्र, संपादकीय मजकुराचे सदर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा