सामान्य अध्ययन-१
प्रश्नमालिका
भारतीय राज्यपद्धती (Indian Polity)
प्र.१. अचूक विधान ओळखा-
अ) केंद्रीय प्रशासकीय लवाद (CAT) ची स्थापना १९८५ साली दिल्ली येथे झाली़
ब) राज्यघटनेचे ३५३वे कलम हे केंद्रीय प्रशासकीय लवादासंबंधी आह़े
क) प्रशासकीय लवाद नेमण्याचा अधिकार भारतीय संसदेला आह़े
ड) सैन्याचे कर्मचारी, अधिकारी, सुप्रीम कोर्टाचे कर्मचारी, संसद सचिवालयाचे कर्मचारी या लवादाच्या कक्षेत येतात़
पर्याय- (१) अ, ब, क, ड (२) अ, क, ड
(३) अ, ब, ड (४) अ, ब, क
प्र. २ नियंत्रक व महालेखापालसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत़
(अ) नियंत्रक व महालेखापाल हा सार्वजनिक लेखा समितीचा मार्गदर्शक, मित्र व तत्त्वज्ञ म्हणून काम पाहतो़
(ब) १९७६ सालापासून नियंत्रक व महालेखापाल यांच्याकडून लेखासंकलनाचे कार्य काढून घेण्यात आल़े
(क) नियंत्रक व महालेखापाल त्याच्या निवृत्तीनंतर केंद्र व राज्य सरकारची महत्त्वाची पदे भूषवू शकतो़
(ड) नियंत्रक व महालेखापालाला पदमुक्त करण्याची प्रक्रिया ही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला पदमुक्त करण्याच्या प्रक्रियेसारखीच असत़े
पर्याय- (१) अ, ब, ड (२) अ, क, ड
(३) अ, ड (४) अ, ब, क, ड
प्र. ३ चुकीचे विधान ओळखा-
(अ) घटनेच्या सहाव्या परिशिष्टात आसाम, मेघालय, त्रिपूरा व मिझोराम या चार राज्यांतील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासंबंधी तरतुदी नमूद केल्या आहेत़
(ब) भारतातील आठ राज्यांमध्ये अनुसूचित क्षेत्रांचा अंतर्भाव आह़े
(क) कारबी अँगलाँग हा जिल्हा आसाम राज्यातील आदिवासी क्षेत्रात मोडतो़
(ड) चकमा हा जिल्हा त्रिपुरा राज्यातील आदिवासी क्षेत्रात मोडतो़.
प्र. ४. चुकीचे विधान ओळखा-
पर्याय-(अ) १९५५ साली राष्ट्रपतींनी बी़ जी़ खेर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयीन भाषा आयोगाची स्थापना केली होती़
(ब) १९६३ साली संसदेने कार्यालयीन भाषा कायदा संमत केला़
(क) राज्यांना संविधानाच्या आठव्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या भाषाच स्वीकारण्याचे बंधन आह़े
(ड) राज्यातील अल्पसंख्याकांनी भाषिक मागणी केल्यास राष्ट्रपतींचे समाधान झाल्यास त्या राज्यातील बोलीभाषेलाही राष्ट्रपती कार्यालयीन भाषेचा दर्जा देऊ शकतो़
प्र. ५ अचूक जोडी ओळखा-
कलम तरतुदी
(अ) २६३ – आंतरराज्य पाणीवाटप तंटा मिटविण्याच्या संदर्भात कायदे करण्याचा संसदेचा अधिकाऱ
(ब) २६२ – राष्ट्रपतींना आंतरराज्य परिषद नियुक्त करण्याचा अधिकार
(क) ३०२ – संसदेला आंतरराज्य व्यापारावर र्निबध लादण्याचा अधिकार
(ड) २५३ – आणीबाणीच्या काळात संसदेला राज्यसूचीमधील विषयावर कायदे करण्याचा अधिकार
भारतीय अर्थव्यवस्था
प्र.६. भांडवली खात्यामध्ये (Capital Account) खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो़
(अ) अनिवासी भारतीयांच्या ठेवी (ब) कर्जसेवा देणी
(क) परकीय गुंतवणूक
(ड) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज
पर्याय- (१) अ, ब (२) अ, ब, क (३) ड (४) अ, ब, क, ड
प्र. ७ २००१-०२ या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेत केलेल्या आर्थिक सुधारणांबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
(अ) परकीय संख्यात्मक गुंतवणुकीचे प्रमाण ४९% पर्यंत वाढविल़े
(ब) तोटय़ात चाललेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात स्वेच्छानिवृत्तीची योजना सुरू केली़
(क) भारतीय खाजगी क्षेत्रासाठी संरक्षण क्षेत्रे १००% खुले करण्यात आल़े
(ड) खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये थेट परकीय गुंतवणूकीचे प्रमाण ७४% पर्यंत वाढविल़े
(क्रमश:)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा