विषय : इतिहास
प्र. 1. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1) सन 1919 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय खिलाफत चळवळीचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी यांची निवड झाली होती.
2) ‘रौलेट कायद्याविरुद्ध गांधींनी सत्याग्रह सुरू केला, त्यात भाग घेण्यासाठी मी हजर नव्हतो, एवढेच मला वाईट वाटते’, हे उद्गार लोकमान्य टिळकांचे आहे.
पर्याय : अ) विधान 1 बरोबर ब) विधान 2 बरोबर
क) विधान 1 व 2 बरोबर ड) विधान 1 व 2 चूक
प्र. 2. खालीलपकी कोणते विधान चूक आहे?
1) 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधीजींनी आपल्या 75 सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमापासून दांडीयात्रेस आरंभ केला. याच दिवसापासून सविनय कायदेभंगाचा लढा सुरू झाला.
2) सन 1919 – 20 मध्ये सुरू करण्यात आलेली असहकाराची चळवळ महात्माजींनी मध्येच स्थगित केली. कारण की चौरीचौरा (उ.प्र.) येथील िहसाचार त्यास कारणीभूत ठरला होता.
पर्याय : अ) विधान 1 चूक ब) विधान 2 चूक
क) विधान 1 व 2 चूक ड) विधान 1 व 2 बरोबर
प्र. 3. 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या पुणे कराराशी खालीलपकी कोणती बाब विसंगत आहे?
पर्याय : अ) हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची कल्पना त्याज्य ठरविली गेली.
ब) हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य करण्यात आले.
क) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हरिजनांना प्रतिनिधित्व दिले गेले.
ड) हरिजनांसाठी 148 जागा राखीव ठेवण्यात आल्या.
प्र. 4. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1) मार्च, 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले. त्यावेळी विन्स्टन चíचल इंग्लंडचे पंतप्रधान होते.
2) सप्टेंबर 1946 रोजी राष्ट्रसभेने जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन केले.
पर्याय : अ) विधान 1 बरोबर ब) विधान 2 बरोबर
क) विधान 1 व 2 बरोबर ड) विधान 1 व 2 चूक
प्र. 5. खालीलपकी कोणते विधान महात्मा गांधी व
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्यामध्ये 24-25 सप्टेंबर 1932 रोजी घडून आलेल्या पुणे करारासंदर्भात चुकीचे आहे ?
पर्याय : अ) हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत; पण राखीव जागा नसाव्यात, असे मान्य करण्यात आले.
ब) हरिजनांसाठी राखीव असाव्यात; परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत, असे ठरविण्यात आले.
क) हा करार येरवडा येथील तुरुगांत घडून आल्याने तो येरवडा करार म्हणूनही ओळखला जातो.
ड) या करारान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हरिजनांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या.
प्र. 6. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1) ‘गांधीजी म्हणजे एका माणसाचे सन्यच!’ गांधीजींविषयीचे हे गौरवोद्गार लॉर्ड माऊंटबॅटन यांचे आहेत.
2) भारताला जर आपल्या देशातील दारिद्रय़ व विषमता नष्ट करावयाची असेल तर त्यास समाजवादाची कास धरावी लागेल, हे विचार पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहेत.
पर्याय : अ) विधान 1 बरोबर ब) विधान 2 बरोबर
क) विधान 1 व 2 बरोबर ड) विधान 1 व 2 चूक
प्र. 7. खालीलपकी कोणते विधान चूक आहे?
1) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या 1857 चे स्वातंत्र्यसमर या मराठी ग्रंथांचा इंग्रजी अनुवाद करण्याचे श्रेय शामजी कृष्ण वर्मा या विद्वान क्रांतिकारकाकडे जाते.
2) फ्रान्सच्या किनाऱ्यावर मास्रेलिस बंदराजवळ सावरकरांनी बोटीतून केलेल्या साहसी पण अयशस्वी पलायनाने सर्वत्र खळबळ माजली. ‘पेनिन्शुलर अँड ओरिएंट’ कंपनीच्या मालकीच्या या बोटीचे नाव एम.एम.मोरिआ. असे होते.
पर्याय : अ) विधान 1 चूक ब) विधान 2 चूक
क) विधान 1 व 2 चूक ड) विधान 1 व 2 बरोबर
प्र. 8. खालीलपकी कोणत्या कायद्यान्वये केंद्र व प्रांत या दोन्ही स्तरांवर लोकसेवा आयोगाची रचना करण्याची तरतूद करण्यात आली होती?
पर्याय :
अ) पिट्स इंडिया अॅक्ट क) 1909 चा सुधारणा कायदा
ब) 1919 चा सुधारणा कायदा ड) 1935 चा भारत सरकार कायदा
प्रश्नांची उत्तरे : प्र. १- क, प्र. २- ड, प्र. ३- ब, प्र. ४- क,
प्र. ५- अ, प्र. ६- क, प्र. ७- क, प्र. ८- ड
(क्रमश:)
यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न
विषय : इतिहास प्र. 1. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे? 1) सन 1919 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय खिलाफत चळवळीचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी यांची निवड झाली होती. 2) ‘रौलेट कायद्याविरुद्ध गांधींनी सत्याग्रह सुरू केला, त्यात भाग घेण्यासाठी मी हजर नव्हतो, एवढेच मला वाईट वाटते’, हे उद्गार लोकमान्य टिळकांचे आहे.
First published on: 11-04-2013 at 02:25 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc question papers with answers for practice