विषय : राज्यघटना
प्र. 13. लोकसभेच्या सभापती संदर्भात खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
पर्याय : अ) आपल्या पदाचा राजीनामा देणाऱ्या सभापतीला आपले राजीनामापत्र उपसभापतीला उददेशून लिहावे लागते.
ब) साधारण मुदत संपण्यापूर्वी सभागृहाचे विसर्जन झाल्यास त्याचे सभापतीपद रद्द होते.
क) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत सभापती आपल्या पदी राहतात.
ड) सभापतींपदी निवड होत असताना तो सभागृहाचा सभासद असण्याची आवश्यकता नसली तरी निवड झाल्यापासून सहा महिन्यांत त्याला सभागृहामध्ये निवडून यावे लागते.
प्र. 14. खालीलपकी कोणते विधान भारताच्या संविधानातील चौथ्या परिशिष्टाचे बरोबर वर्णन करते?
पर्याय : अ) राज्यसभेतील जागांचे वाटप त्यामध्ये दिले आहे.
ब) केंद्र आणि राज्यादरम्यान सत्तेच्या वाटपाची योजना त्यामध्ये दिली आहे.
क) जमातींच्या क्षेत्रांच्या प्रशासनाविषयींच्या तरतुदी त्यामध्ये दिल्या आहेत.
ड) संविधानात नमूद केलेल्या भाषांची सूची त्यामध्ये दिली आहे.
प्र. 15. लक्षवेधी प्रस्तावाच्या बाबतीत खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1) एखाद्या मंत्र्यांचे महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्याची ती एक युक्ती आहे.
2) मंत्र्याने त्याविषयी अधिकारवाणीने विधान करावे हा त्यामागील उद्देश असतो.
3) सरकारला दोष देणे असा या प्रस्तावाचा अर्थ नाही.
4) संसदेच्या कामकाज नियमावलीत आणि प्रक्रियेत तिचा समावेश नाही.
पर्याय : अ) 2 व 4 विधान बरोबर आहे.
ब) 2 व 3 विधान बरोबर आहे.
क) फक्त 1 विधान बरोबर आहे.
ड) 1, 2 व 3 विधान बरोबर आहे.
प्र. 16. खालीलपकी कोणत्या गोष्टीचा संविधानात स्पष्ट उल्लेख नसला तरी एक प्रघात म्हणून तिचे पालन केले जाते?
पर्याय : अ) अर्थमंत्री लोकसभेचा सभासद असतो.
ब) लोकसभेतील बहुमत गमावल्यावर पंतप्रधान राजीनामा देतात.
क) भारतातील सर्व राजकीय पक्षांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले जाते.
ड) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांनी त्यांची मुदत संपण्यापूर्वी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यास लोकसभेच्या सभापती हंगामी राष्ट्रपतीपद धारण करतो.
प्र. 17. खालीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?
आíथक आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती ….
पर्याय : अ) सर्व नागरी सेवकांच्या वेतनात व भत्त्यात कपात करू शकतात.
ब) सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनात कपात करू शकतात.
क) नागरिकांचे मूलभूत अधिकार स्थगित करू शकतात.
ड) केंद्र व राज्य सरकार यांना आíथक प्राधान्यक्रम ठरविण्याचे निर्देश देऊ शकतात.
प्र. 18. के. सुब्रह्मण्यम या संरक्षणविषयक तज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली कशासाठी समिती नेमली गेली होती?
पर्याय : अ) कारगिलमधील घुसखोरीसंदर्भात
ब) अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरीसंदर्भात
क) गडचिरोलीमधील नक्षलवादासंदर्भात
ड) यांपकी नाही.
प्र. 19. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1) राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पक्षांतर बंदी विधेयक संमत केले गेले.
2) केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव पारित करण्याचा अधिकार लोकसभेस आहे.
पर्याय : अ) विधान 1 बरोबर ब) विधान 2 बरोबर
क) विधान 1 व 2 बरोबर ड) विधान 1 व 2 चूक
प्रश्नांची उत्तरे : प्र. १३- क, प्र. १४- अ, प्र. १५- ड, प्र. १६- ब, प्र. १७- क, प्र. १८- अ, प्र. १९- १.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा