विषय : इतिहास
प्र. 25. खालील घटनांचा योग्य क्रम लावा.
1) टिळक स्वराज्य फंडाची स्थापना
2) चौरीचौरा घटना
3) असहकार आंदोलनाची समाप्ती
4) खिलापत आंदोलन स्थगिती
पर्याय : अ) 1, 2, 3, 4 ब) 4, 3, 2, 1
क) 2, 3, 4, 1 ड) 2, 1, 3, 4
प्र. 26. खालील विधाने लक्षात घ्या.
1) जुल 1905 मध्ये कोलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये बंगाल विभाजनाविरुद्ध आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
2) बहिष्काराचा प्रस्ताव याच ठिकाणी पारित करण्यात आला.
वरील विधानांपकी कोणते विधान अयोग्य आहे ते सांगा
पर्याय : अ) फक्त 1 ब) फक्त 2
क) दोन्ही ड ) दोन्ही बरोबर
प्र. 27. विधान A : सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगाल येथे फेडरेशन हॉलची स्थापना केली.
स्पष्टीकरण R : या हॉलच्या स्थापनेमागे बंगालची एकता सिद्ध करावयाची होती.
पर्याय : अ) विधान A व R दोन्ही बरोबर असून, R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ब) विधान A व R दोन्ही बरोबर असून, R हे A चे योग्य स्पष्टीकरण नाही.
क) विधान A बरोबर व R चूक.
ड) विधान A चूक व R बरोबर
प्र. 28. काँग्रेसच्या 1907 च्या सुरत येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली हे 1907 चे अधिवेशन पूर्वी कोठे होणार होते?
पर्याय : अ) कोलकत्ता ब) बनारस
क) मुंबई ड) नागपूर
प्र. 29. मोल्रे-िमटो सुधारणा कायद्यामागे ब्रिटिशांचा खालीलपकी कोणता उद्देश होता?
पर्याय : अ) सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देणे.
ब) भारतीयांचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व वाढवणे.
क) भारतीयांना राजकीय फायदा मिळवून देणे.
ड) वरीलपकी नाही.
प्र. 30. विधान A : 1911 मध्ये भारताच्या राजधानीचे ठिकाण पूर्व भारतामधून पश्चिम भारतात बदलण्यात आले.
स्पष्टीकरण : R : 1911 मध्ये ब्रिटिश सम्राट जॉर्ज पंचम यांचे दिल्लीत आगमनासाठी दिल्ली दरबार भरविण्यात आला होता.
पर्याय : अ) विधान A व R दोन्ही बरोबर असून, R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ब) विधान A व R दोन्ही बरोबर असून, R हे A चे योग्य स्पष्टीकरण नाही.
क) विधान A बरोबर व R चूक.
ड) विधान A चूक व R बरोबर
प्र. 31. 1919 च्या अधिनियमाबाबत खालील विधाने लक्षात घ्या.
1) या कायद्यानुसार भारत सचिवाचे वेतन भारतीय तिजोरीतून देणे बंद झाले.
2) भारत सचिवाच्या साहाय्यासाठी इंडियन हाय कमिशनर पदाची नियुक्ती करण्यात आली.
3) इंडियन हाय कमिशनरला ब्रिटिश सरकारकडून वेतन मिळणार होते.
वरील विधानांपकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहेत ते सांगा.
पर्याय : अ) फक्त 1 व 3 ब) फक्त 2
क) फक्त 3 ड) फक्त 2 व 1
प्र. 32. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1) ‘भारत माता सोसायटी’ नावाची क्रांतिकारी संघटना पंजाब या ठिकाणी कार्यरत होती.
2) भारत माता सोसायटीमध्ये अजित सिंह, लाला हरदयाल व
जे. एम. चटर्जी हे क्रांतिकारक होते.
पर्याय : अ) विधान 1 बरोबर ब) विधान 2 बरोबर
क) विधान 1 व 2 बरोबर ड) विधान 1 व 2 चूक
प्र. 33. क्रांतिकारकांवर चालविल्या जाणाऱ्या खालील खटल्याचा योग्य क्रम लावा.
1) लाहोर केस 2) नाशिक केस
3) हावडा केस 4) अलीपूर केस
पर्याय : अ) 2, 1, 4 व 3 ब) 4, 2, 3 व 1
क) 3, 1, 2 व 4 ड) 1, 2, 3 व 4
उत्तरे : प्र. २५- अ, प्र. २६- अ, प्र. २७- ड, प्र. २८- ड,
प्र. २९- अ, प्र. ३०- ड, प्र. ३१- क, प्र. ३२- क, प्र. ३३- ब.
यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न
विषय : इतिहास प्र. 25. खालील घटनांचा योग्य क्रम लावा. 1) टिळक स्वराज्य फंडाची स्थापना 2) चौरीचौरा घटना 3) असहकार आंदोलनाची समाप्ती 4) खिलापत आंदोलन स्थगिती
First published on: 14-04-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc question papers with answers for practice