मित्रांनो, यापूर्वी आपण सामान्य अध्ययन पेपर-२ या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी उताऱ्यावरील प्रश्नोत्तरांची चर्चा केली. आजच्या आपण सामान्य अध्ययन पेपर-१ या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नोत्तरांचे अवलोकन करणार आहोत.
भारतीय राज्यपद्धती, अर्थव्यवस्था, इतिहास, भूगोल यावरचे नमुना प्रश्न तुम्हाला सरावासाठी दिले होते. त्या प्रश्नांची उत्तरे येथे दिलेली आहेत. तुम्हाला यामधील प्रश्न फार कठीण वाटले असतील, तरी धीर सोडू नका. एखादा खेळाडू जसा स्पर्धेआधी कसून सराव करून यश मिळवितो, त्या तशा प्रकारे अभ्यासाला तुम्ही सुरुवात करा. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आली नसतील तर सरळ बेसिक पुस्तके हातात घेऊन त्यातून उत्तरे शोधा. या प्रक्रियेत संदर्भसाहित्य कसे अभ्यासायचे, याचे ज्ञान मिळेल.
उदा. इतिहास भागावर कॅबिनेट मिशनवर आधारलेला एक प्रश्न विचारला आहे, या प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्ही १९०९ चा कायदा, १९१९ चा कायदा, १९३५ चा कायदा, क्रिप्स मिशन, राजाजी योजना अशा महत्त्वाच्या घटनांचा आणि त्यातील ठळक तरतुदींचा एखादा तक्ता बनवू शकता, ज्यातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक आराखडा तुमच्या डोक्यात पक्का होऊन जाईल.
सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिकेत तुमच्या मूलभूत संकल्पना तपासणारे प्रश्न विचारलेले असतात. अर्थशास्त्रामध्ये आपण ‘भांडवली खाते’ याबद्दल माहिती विचारली होती. ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक्स’ या कोषातून तुम्ही अशा कितीतरी अर्थशास्त्रीय संकल्पना स्पष्ट करून घेऊ शकता. उमेदवाराला एखाद्या विषयाचे बेसिक ज्ञान, असायलाच हवे आणि त्याचप्रमाणे चालू वर्तमानाबद्दल तो सजग असायला हवा.
उदा. सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर भारतात बरेच विचारमंथन सुरू आहे. तेव्हा नियंत्रक आणि महालेखापालाची भारतीय संसदीय लोकशाही प्रक्रियेत काय भूमिका आहे, याबद्दल विद्यार्थ्यांनी विचार करावा, तसे प्रश्न तयार करावेत. ‘भूगोल’ या विषयाचा अभ्यास करताना तुम्ही नकाशाचा जरूर वापर करा. महत्त्वाचे देश, नद्या, पर्वत जगाच्या आणि भारताच्या नकाशात ओळखण्याचे कसब अवगत करा.
अशा प्रकारे अभिनव पद्धतीने जर उमेदवाराने सामान्य अध्ययन या विषयाची तयारी केली, तर निश्चितपणे यश मिळेल.
उतारा ३ ची उत्तरे पुढे दिली आहेत़
Q.1. Why do enviornmental activists take help from the judiciary?
a) Due to irresponsibility and apathy of other institutions.
Q.2. Why author is critical about public interest litigations?
d) All of above are right.
उतारा ४ ची उत्तरे-
Q.1. The degration of natural resources will necessarily lead to,
a) Poor economic utilization of resources.
Q.2. According to NEERI
b) Seventy percent of total water available in the country is polluted.
Q.3. Municipal sewage pollutants account for,
b) Seventy five percent of the Ganga’s Water pollution load.
Q.4. What is the meaning of ‘environmental plunder’?
d) None of the above.
Q.5. Individual proceedings are often far from democratic means-
d) All of above.
Q.6. According to author ‘Judicial activism’ in environmental issues.
c) Has important limitation.
सामान्य अध्ययन-१
भारतीय राज्यपद्धती (Indian Polity)
प्र. १. (४) अ, ब, क, प्र. प्र. (१) अ,ब,ड, प्र. ३ (ड),
प्र. ४. (क) प्र.५ (क)
भारतीय अर्थव्यवस्था
प्र.६. (४) अ,ब,क,ड, प्र.७ (ड), प्र. ८. (ड), प्र. ९. (ड), प्र. १०. (ड),प्र ११. (४) अ,ब,क,ड, प्र. १२ (४)अ,ब,क,ड प्र. १३. ४ अ,ब,क,ड प्र. १४. (ड), प्र. १५. (ड)
विषय : इतिहास
प्र. १६ (ब), प्र. १७ (ड), प्र. १८. (अ), प्र. १९. (२) अ व ब दोन्ही बरोबर प्र. २०. (१) अ, ब, क, प्र. २१. (ड), प्ऱ २२ (क) प्ऱ २३ (अ)
विषय : भूगोल
प्र. २४. (३), प्र. २५. (ड), प्र. २६. (अ), प्र. २७. (३),
प्र. ८. (ड), प्र. २९. (३), प्र. ३०. (क), प्र. ३१. (२)
यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न
मित्रांनो, यापूर्वी आपण सामान्य अध्ययन पेपर-२ या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी उताऱ्यावरील प्रश्नोत्तरांची चर्चा केली. आजच्या आपण सामान्य अध्ययन पेपर-१ या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नोत्तरांचे अवलोकन करणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-03-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upscmpsc prelim exam model questions for practise