वैद्यकशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी-पालकांपुढील काळजीचा मुद्दा असतो, तो म्हणजे वैद्यकीय शिक्षणाच्या भरमसाठ शुल्काचा. मात्र, देशभरात अशी काही दर्जेदार महाविद्यालये आहेत, ज्यांचे शुल्कही वाजवी आहे. अशा काही महाविद्यालयांची ओळख-
* जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (JIMPER).
ही संस्था केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. एमबीबीएस व वैद्यकीय क्षेत्रातील उच्चशिक्षण आणि संशोधनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणारी पुडीचेरी (पाँडेचेरी) येथील ही देशातील आघाडीची संस्था आहे.
* प्रवेश परीक्षा : या संस्थेच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रवेशपरीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा २ जुल २०१३ रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या कालावधीत घेतली जाईल. प्रत्येक केंद्रावर कमाल पाच हजार विद्यार्थ्यांचीच सोय उपलब्ध केली जाते. यापेक्षा अधिक उमेदवारांची संख्या वाढल्यास इतर सर्व विद्यार्थ्यांना पुडीचेरी केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेद्वारे १४१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही परीक्षा पुढील शहरांमध्ये घेतली जाते- बंगलोर, भोपाळ, चंदिगड, चेन्नई, कोईम्बतूर, गौहाटी, जयपूर, कोलकाता, न्यू दिल्ली, पुडूचेरी, थिरुवनंतपूरम, त्रिची, विजयवाडा. महाराष्ट्रातली केंद्रे- पुणे.
* प्रवेशपरीक्षेचा अभ्यासक्रम : या संस्थेच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम राज्य बोर्ड आणि सीबीएसईच्या अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित आहे.
प्रश्नपत्रिका केवळ इंग्रजीत राहील. पेपर २०० गुणांचा आणि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा म्हणजेच मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचा राहील. फिजिक्स ,केमिस्ट्री, झुऑलॉजी, बॉटनी आणि इंग्रजीवर आधारित प्रश्न विचारले जातील. खुल्या संवर्गातील उमेदवारांना किमान ५० टक्के गुण आणि इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे संस्थेच्या वेबसाइटवर घोषित केली जातील.
प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिल्या जाणाऱ्या १४१ जागांपकी १०१ जागा या अखिल भारतीय स्तरावरील असून उर्वरित जागा पुडिचेरीसाठी राखीव आहेत. अखिल भारतीय स्तरावरील जागांमध्ये खुल्या संवर्गातील जागा- ५१, इतर मागास वर्ग संवर्ग-२७, अनुसूचित जाती संवर्ग- १५, अनुसूचित जमाती संवर्ग- ८ यांचा समावेश आहे.
* प्रवेशपरीक्षेसाठी अर्हता : या संस्थेच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेशपरीक्षेला बसणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्हता- बारावी विज्ञान परीक्षेतील फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी या विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. तसेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्रजी या विषयांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण व्हावं लागेल. इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शारीरिकदृष्टय़ा अपंग संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्हता-बारावी विज्ञान परीक्षेतील फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी या विषयात किमान ४० टक्के गुण आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्रजी या विषयांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणं आवश्यक. उमेदवाराने ३१ डिसेंबर २०१३ रोजी १७ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
* अर्ज प्रक्रिया : या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ऑनलाइन रजिस्ट्रशेन फी- खुला संवर्ग आणि इतर मागास संवर्ग एक हजार रुपये. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग- ८०० रुपये.
* शुल्क : प्रवेशशुल्क (एकदाच)- चार हजार हजार रुपये, प्रतिवर्षी भरायचे शुल्क- शैक्षणिक फी- १४०० रुपये. स्टुडंट असोशिएशन फी- १५०० रुपये. लर्निंग रिसोर्स फी- २०००
रुपये. हॉस्टेल फी- ६००० रुपये.
* संपर्क : जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (JIMPER), धन्वंतरी
नगर, पुडुचेरी- ६०५ ००६, वेबसाइट http://www.jimper.edu.in, ई-मेल- director@jimper.edu.in,
दूरध्वनी- ०४३१-२२ ७२ ३८०, फॅक्स-२२७२०६७.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा