कोल्हापूरमध्ये आणखी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. भुदरगड तालुक्यातील आकुर्डी येथे ही करोनाबाधित व्यक्ती मुंबईहून प्रवास करुन आली होती. यामुळे आजवर शहरी भागात असणाऱ्या करोनाच्या विषाणूने कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ११वर पोहोचली आहे. यातील चौघेजण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

भुदरगड तालुक्यातील आकुर्डी येथे आज करोनाचा रुग्ण सापडला. मुंबई, सावंतवाडी असा प्रवास करून हा रुग्ण आकुर्डीत आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या माहितीनंतर एकच खळबळ उडाली असून या रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. संबंधित व्यक्तीला गावातील नागरिकांनी क्वारंटाइन करून ठेवल्याने धोका टळला आहे.

Story img Loader