जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. करोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत १९५ देशांत पसरला असून पाच लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. २६ हजारांपेक्षा आधिक नागरिकांचा या महामारीनं बळी घेतला आहे. भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. लोकांमध्ये या अनोख्या व्हायरसची प्रचंड भीती पसरली असून कोल्हापुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

करोना व्हायरसच्या धास्तीनं कोल्हापुरातील एका वृद्ध महिलेने आत्महत्या केली आहे. मालुताई आवळे असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. कोल्हापूरजवळील शिये येथे ही दुर्देवी घटना घडली. शिये येथे असलेल्या पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेत वृद्ध महिलेने आपला जीवनप्रवास संपवला. गुरुवारी त्या वृद्ध महिलेचा मृतदेह नदीपात्रात सापडला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केली असल्याची माहिती वृद्ध महिलेच्या मुलाने पोलिसांना दिली आहे.

करोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे देशात २१ दिवसांसाठी मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. सकंटाच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरिकांसाठी सर्वोत्परीने प्रयत्न करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच यासंदर्भातील महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहतील. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेय. तरीहीकरोना व्हायरसच्या धास्तीने वृद्ध महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे.

Story img Loader