चंद्रकांत पाटील यांची माहिती
राज्यातील १५०० शासकीय इमारतींमध्ये एलईडी टय़ुबलाईट, बल्ब तसेच एसी बदलण्याचा प्रकल्प यशस्वी केला आहे. यामुळे वर्षांला सुमारे १०० कोटींची बचत होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे दिली. राज्यातील सर्व नगरपालिकांतील रस्ते एलईडी पथदिव्यांनी उजळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यतील नगरपालिकांमध्ये शासन पुरस्कृत एनर्जी एफिशियन्सी सव्र्हिसेस लिमिटेड या कंपनीच्यावतीने पथदीप राष्ट्रीय उपक्रम हाती घेतला असून त्याचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाटील यांनी हुपरी नगरपालिकेमध्ये या अंतर्गत लावलेल्या एलएडी दिवे ऑनलाइन पध्दतीने अनावरण केले. मंत्री पाटील यांनी नगराध्यक्षा जयश्री गाठ यांना एलईडी टय़ुबलाईट भेट दिली. राज्यातील सांडपाणी शुध्दीकरणाबाबत शासनाने विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे सांगून पाटील म्हणाले, आता ग्रमीण भागातही सांडपाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. यासाठी चारपाच गावांसाठी सांडपाणी शुध्दीकरणाचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पांसाठी महानगरपालिका आणि नगरपालिकांना सहाय्य केले जाईल.
निसर्गाचा ऱ्हास रोखताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे वीज, पाणी बचतीचे नवनवे प्रयोग हाती घेणार असल्याचेही ते म्हणाले. ‘ई—कार’ या उपक्रमालाही शासनाने प्राधान्य दिले असून इलेक्ट्रीक कारचा विनियोग करण्यावर भर दिला आहे. राज्य शासनाने अशा पाच कार घेतल्या असून यापुढील काळात शहरातील वाहतुकीसाठी शासकीय कार्यालयांना ‘ई—कार’ उपयुक्त ठरतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
कंपनीचे दीपक कोकाटे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यतील १२ नगरपालिकांनी सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यसाठी २८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे