कोल्हापूर : बर्ड्स ऑफ कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात आलेल्या कोल्हापूर पक्षी गणनेत कळंबा तलाव येथे १०५ प्रजातींच्या ११६१ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यामधील १९ स्थलांतरित प्रजाती, ८६ रहिवासी प्रजातींची नोंद करण्यात आली.
बर्ड्स ऑफ कोल्हापूरचे प्रणव देसाई, पृथ्वीराज सरनोबत, सतपाल गंगलमाले, मंदार रुकडीकर, ऋतुजा पाटील, प्रणव दातार यांनी पक्षी गणनेची पूर्तता केली. यामध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ पक्षीमित्रांनी सहभाग घेतला होता.
स्थलांतरित पक्षी : कॉमन ग्रीनशँक (हिरव्या पायाचा तुतवार), ग्रीन सँडपायपर (हिरवी तुतारी), वूड सँडपायपर (ठिपकेवाली तुतारी), कॉमन सँडपायपर (सामान्य तुतारी), टेमींक्स स्टिंट (टेमींकचा टीलवा), ब्राउन श्राइक (तपकीरी खाटीक), एशी ड्रोंगो (राखाडी कोतवाल), रोजी स्टारलिंग (पळस मैना), रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर (लाल छातीचा माशीमार), वर्डीटर फ्लायकॅचर (निलांग), क्लेमरस रीड वॉब्लर (बडबड्या बोरु वटवट्या), ब्लिथस रीड वॉब्लर (ब्लिथचा बोरू वटवट्या), साईक्स वॉब्लर (साईक्सचा वटवट्या), बुटेड वॉब्लर (पायमोज वटवट्या), लेसर व्हाईट थ्रोट (छोटा शुभ्रकंठी), कॉमन चीफचॅफ (सामान्य चिपचीप), ट्री पीपीट (वृक्ष तिरचिमणी), वेस्टर्न यल्लोव वॅगटेल (पिवळा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी) संकटग्रस्त यादीतील प्रजाती : इंडियन रिव्हर टर्न (नदी सुरय), वुली नेक स्टोर्क (पांढऱ्या मानेचा करकोचा), पैंटेड स्टोर्क (चित्रबलाक).