कोल्हापूर : येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मंगळवारी सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्याच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील विविध घटनांचे सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये लक्षवेधी ठरले ते सलग १२ तास लाठीकाठी फिरवण्याचा उपक्रम. पापाची तिकटी परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समितीच्या वतीने आज जयंती कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये पहाटेपासून लाठीकाठी उपक्रमाचे आयोजन केले होते.

चित्तथरारक प्रात्यक्षिक

सैनिकाचे गाव गिरगाव येथील भैरवनाथ तालमीचे मल्ल संपत दत्तात्रय पाटील यांनी ८ वर्षांचा मुलगा दक्ष त्याच्यासोबत सलग १२ तास लाठीकाठी फिरवत मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवले. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

हेही वाचा – कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाची महापालिका, प्रांत विभागाकडून पाहणी सुरू; जयंती नाल्याचे पाणी थेट नदीत मिळत असल्याचे उघडकीस

हेही वाचा – कोल्हापूर महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे निलंबित; पद्माराजे उद्यान्यातील वृक्षतोड प्रकरण भोवले

संभाजी महाराज पाळणा गीत

संभाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा पाळणा गीतातून समोर आला आहे. शिव-शाहू पोवाडा मंच आणि शाहीर दिलीप सावंत यांच्या पुढाकाराने निर्मिती झालेल्या पाळणा गीतास वेदु सोनुले, तृप्ती सावंत, वैदेही जाधव यांनी स्वरसाज चढवला.

Story img Loader