इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बँकेमध्ये ३ कोटी ५८ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, त्यांची पत्नी कांचन पुजारी , शाखाधिकारी मलकारी लवटे यांच्यासह १९ जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कर्जविभाग प्रमुख राजेेंद्र गणपती जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक रावसाहेब महादेव जावळे,शाखाधिकारी राजेंद्र जयपाल मौर्य, वरिष्ठ अधिकारी सुरेखा जयपाल बडबडे, कनिष्ठ अधिकारी मारुती कोंडीबा अनुसे, शिपाई अभिजित मल्हारी सोलगे, रोखपाल वैभव बाळगोंडा गवळी, निलेश शिवाजी दळवी,रोहित बळवंत कवठेकर, सर्जेराव महादेव जगताप आयटी व्यवस्थापक शेखर नारायण खरात (रा. सांगलीवाडी), शाखाधिकारी प्रभाकर बाजीराव कदम, शाखाधिकारी राहुल प्रकाश पाटील, शाखाधिकारी विकास वसंत साळुंखे, सारीका निलेश कडतारे, शिपाई विजय परशराम माळी यांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> आरक्षणातील ५० टक्क्यांची अट निघत नाही तोवर गुंता कायम; जनतेला फसवू नका – अशोक चव्हाण
फिर्यादी धोंडीराम चौगुले हे शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बँकेचे लेखापरीक्षण करण्यासाठी नियुक्ती करण्यात आले आहेत. लेखापरीक्षणामध्ये वर नमुद संशयितांनी कर्जाची येणे बाकी असताना कपटाने बनावट निरंक दाखले देणे व ते खरे म्हणून वापरणे, कर्जाची बाकी असताना बेकायदेशीर उचल देणे, कर्जाला बेकायदेशीर सवलत देणे, अध्यक्ष व पत्नी यांना नियमबाह्य कर्ज देणे, संचालक मंडळाची मंजूरी न घेता कर्ज वाटप करणे आदीप्रकारे पदाचा दुरुपयोग करत एकूण ३ कोटी ५८ लाख हजाराचा अपहार व गैरव्यवहार संगनमताने केल्याचा ठपका ठेवला आहे. अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्यासह १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरीत सुरेखा बडबडे, सर्जेराव जगताप, राहुल पाटील, सारीका कडतारे आणि कांचन पुजारी यांचा शोध सुरु आहे.